प्लास्टोच्या जाहिरात अभियानातून हृतिकला भेटण्याची संधी

By admin | Published: August 5, 2016 03:14 AM2016-08-05T03:14:25+5:302016-08-05T03:14:25+5:30

वॉटर टँक आणि पाईप सोल्यूशनमध्ये मध्य भारतात आघाडीच्या प्लास्टो ग्रूप आॅफ कंपनीजने अभिनेता हृतिक रोशन

The opportunity to meet Hrithik through Plasto's advertising campaign | प्लास्टोच्या जाहिरात अभियानातून हृतिकला भेटण्याची संधी

प्लास्टोच्या जाहिरात अभियानातून हृतिकला भेटण्याची संधी

Next

मीडिया पार्टनर : ‘मोहेन्जोदडो’चे प्रसिद्धी अभियान
नागपूर : वॉटर टँक आणि पाईप सोल्यूशनमध्ये मध्य भारतात आघाडीच्या प्लास्टो ग्रूप आॅफ कंपनीजने अभिनेता हृतिक रोशन यांचा ‘मोहेन्जोदडो’ चित्रपटाचे मीडिया पार्टनर म्हणून प्रारंभ केला आहे. प्लास्टोने प्लास्टो आणि ‘मोहेन्जोदडो’ असे को-ब्रॅण्डिंग अभियान सुरू केले आहे. प्लास्टो को-बॅ्रण्डिंग व्हिडिओ जाहिरात ७ आॅगस्टपर्यंत फेसबुकवर शेअर करणाऱ्यांना हृतिक रोशनशी भेटण्याची संधी आहे. लिंकद्वारे यात भाग घेता येणार आहे.
वॉटर टँक, पाईप्स आणि फिटिंग सोल्यूशन्सचे उत्पादन व वितरणात आघाडीचा हा समूह मध्य भारतासह संपूर्ण देशात परिचित आहे. यामुळेच कंपनी ‘मोहेन्जोदडो’चे मीडिया भागीदार बनले आहे. कंपनीतर्फे फिल्मच्या माध्यमातून विविध प्रसिद्धी माध्यमांमध्ये जाहिरात दिली जाते. त्यात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा समावेश आहे. या चित्रपटात पूजा हेगडेसह हृतिक रोशनची महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाची निर्मिती यूटीव्ही बॅनर अंतर्गत करण्यात आली असून आशुतोष गोवारीकर दिग्दर्शक आहेत. चित्रपट १२ आॅगस्टला प्रदर्शित होणार आहे.
टँक आणि पाईपमध्ये प्लास्टो तीन दशकांपासून बाजारात असून गुणवत्तापूर्ण उत्पादने आणि वितरणात परिचित आहे. फारच कमी कालावधीत कंपनीने या क्षेत्रात आघाडी मिळविली आहे. याच कारणामुळे कंपनीला ‘मोहेन्जोदडो’चे प्रसिद्धी भागीदार बनण्याची संधी मिळाली आहे. संयुक्त सहकार्याने दोन्ही समूहाला बाजारपेठेत प्रोत्साहन मिळणार आहे. दोन्ही कंपन्यांची दर्जेदार उत्पादने आहेत. चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

Web Title: The opportunity to meet Hrithik through Plasto's advertising campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.