सैनिकी मुलामुलींच्या वसतिगृहात प्रवेशाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2023 08:17 PM2023-03-25T20:17:34+5:302023-03-25T20:18:08+5:30
Nagpur News नागपूर येथील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या आजी व माजी सैनिक पाल्यांना सवलतीच्या दरात, युद्ध विधवांच्या व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना मोफत निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध आहे.
नागपूर : माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह क्षमता ६० व माजी सैनिकी मुलींचे वसतिगृह क्षमता ७१ आहे. नागपूर येथील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या आजी व माजी सैनिक पाल्यांना सवलतीच्या दरात, युद्ध विधवांच्या व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना मोफत निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. जागा उपलब्ध असल्यास सर्वसाधारण नागरिक पाल्यांनासुद्धा प्रवेश देण्यात येणार आहे.
ज्या आजी-माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना तसेच युद्ध विधवांचे आणि सर्वसाधारण नागरिकांचे पाल्य आणि अन्य नागपूर येथील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहेत आणि ते या वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र.१, तिसरा माळा, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथून ५० रुपयांचा प्रवेश अर्जाचा नमुना व माहिती पुस्तिका घेऊन ३१ मेपर्यंत माजी सैनिक ओळखपत्र, गुणपत्रिका व शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्याच्या संस्थेच्या दाखल्याची छायांकित प्रतीसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नागपूर येथे जमा करावे, असे आवाहन मेजर डॉ. शिल्पा खरपकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नागपूर यांनी केले आहे.