मेटॅडोर उलटला, एक ठार

By admin | Published: March 13, 2016 03:29 AM2016-03-13T03:29:08+5:302016-03-13T03:29:08+5:30

टायर फुटल्याने भरधाव मेटॅडोर उलटला. यात मेटॅडोरमधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले.

The opposite of Metadar, one killed | मेटॅडोर उलटला, एक ठार

मेटॅडोर उलटला, एक ठार

Next

आठ जखमी : सावनेर बायपास महामार्गावरील घटना
सावनेर : टायर फुटल्याने भरधाव मेटॅडोर उलटला. यात मेटॅडोरमधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले. ही घटना सावनेर बायपास महामार्गावर शनिवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
क्रिष्णा देवाजी देशमुख (३६) असे मृताचे नाव आहे. तर जखमींमध्ये चुडामन टकनकर (३०), सुनील टकनकर (२२), रमेश मरस्कोल्हे (२२), शिवपाल दहेजवार (३०), नारायण ढोबळे (४०), बिस्मा झोबलकर (३०), खेमचद मांडवेकर व अन्य एक, रा. मोहखेख, अशी जखमींची नावे आहेत. यापैकी काहींना गंभीर दुखापत झाल्याचे समजते. एमपी-२८/जी-२७०२ क्रमांकाचा मेटॅडोरमध्ये लसूण भरून नागपूरकडे जात होता. दरम्यान, सावनेर बायपास महामार्ग परिसरात मेटॅडोरचा मागील टायर फुटल्याने भरधाव मेटॅडोर उलटला. यात मेटॅडोरमध्ये लसूण मालासह प्रवास करणाऱ्या एका शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य आठ जण जखमी झाले. याबाबत सावनेर पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The opposite of Metadar, one killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.