‘शक्ती वाहिनी’चे कार्यालय उघडण्यास अध्यक्षांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:01 AM2017-09-16T00:01:43+5:302017-09-16T00:02:38+5:30

झिंगाबाई टाकळी येथील ‘शक्ती वाहिनी’ पतसंस्थेत घोळ झाला असून खातेधारकांचे पैसे मिळेनासे झाले आहेत.

The opposition opposes the opening of the office of 'Shakti Vahini' | ‘शक्ती वाहिनी’चे कार्यालय उघडण्यास अध्यक्षांना विरोध

‘शक्ती वाहिनी’चे कार्यालय उघडण्यास अध्यक्षांना विरोध

Next
ठळक मुद्देकुलूप बदलून अध्यक्षांनी चाव्या सोबत नेल्या : कागदपत्र गहाळ झाल्यास जबाबदार कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झिंगाबाई टाकळी येथील ‘शक्ती वाहिनी’ पतसंस्थेत घोळ झाला असून खातेधारकांचे पैसे मिळेनासे झाले आहेत. गेल्या चार आठवड्यापासून पतसंस्था बंद आहे. शुक्रवारी दुपारी पतसंस्थेचे कुलूप बदलण्यासाठी अध्यक्ष प्रतिभा वैद्य तेथे पोहचल्या. मात्र, पतसंस्थेतील महत्त्वाचे दस्तावेज, फाईलची अदलाबदल होऊ नये, कागदपत्र गहाळ केले जाऊ नयेत यासाठी त्यांना घरमालक व काही खातेधारकांनी विरोध केला. शेवटी पोलिसांच्या उपस्थितीत अध्यक्षांनी कुलूप बदलले. विशेष म्हणजे या प्रकरणात अध्यक्ष प्रतिभा वैद्य या देखील संशयाच्या फेºयात असताना पोलिसांनी पतसंस्थेला लागलेल्या दोन्ही कुलूपाच्या चाव्या त्यांना सोबत नेण्यास परवानगी दिली. त्यामुळे या संस्थेतील कागदपत्रांची हेराफेरी झाली तर जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘शक्ती वाहिनी’ पतसंस्थेचा व्यवस्थापक विजय भोयर बेपत्ता आहे. खातेधारकांनी जमा केलेले लाखो रुपये परत मिळेनासे झाले आहेत. काही खातेधारकांना त्यांची रक्कम परत करण्यासाठी चेक देण्यात आले होते. त्यावर अध्यक्ष प्रतिभा वैद्य व व्यवस्थापक विजय भोयर याची स्वाक्षरी आहे. मात्र, ते चेक वटलेच नाहीत. यावरून पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर अध्यक्षांचीही स्वाक्षरी आवश्यक होती, हे स्पष्ट होते. पतसंस्थेचे व्यवहार ठप्प झाल्यामुळे खातेधारकांना अध्यक्ष वैद्य यांच्यावरही विश्वास राहिलेला नाही. गुरुवारी खातेधारकांनी मानकापूर पोलीस ठाण्यात धडक देत व्यवस्थापक भोयर याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तक्रार केली होती. पतसंस्थेच्या कार्यालयाला गुरुवारपर्यंत एकच कुलूप लागले होते. याची किल्ली अध्यक्ष वैद्य व व्यवस्थापक भोयर याच्याकडे असायची. पतसंस्थेत आर्थिक घोळ झाल्यामुळे येथील कागदपत्रे गायब केली जाऊ नयेत म्हणून खातेदारांच्या संमतीने घरमालक गायकवाड यांनी पतसंस्थेला आणखी एक कुलूप लावले.
शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास अध्यक्ष वैद्य या डेली कलेक्शन एजंट रमेश अवचट यांच्यासोबत पतसंस्थेत पोहचल्या. त्यांनी घरमालकाला त्यांचे कुलूप उघडून स्वत:चे कुलूप लावायचे असल्याचे सांगितले. मात्र, कुलूप उघडल्यावर अध्यक्षांकडून कागदपत्रे गहाळ केली जाऊ शकतात, अशी शक्यता वाटल्यामुळे घरमालक व काही खातेधारकांनी विरोध केला. यामुळे घरमालक व अध्यक्ष वैद्य यांच्यात वाद झाला. शेवटी मानकापूर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून खातेधारकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आॅडिटर आल्याशिवाय पतसंस्थेचे कुलूप उघडायचे नाही व एकाही कागदपत्राला हात लावायचा नाही, अशी कडक भूमिका काही खातेधारकांनी घेतली. शेवटी पोलिसांच्या उपस्थितीत घरमालकाने आपले कुलूप उघडले व वैद्य यांनी स्वत:कडील दुसरे कुलूप लावले. वैद्य यांना पतसंस्थेच्या कार्यालयात मात्र प्रवेश करू दिला गेला नाही. विशेष म्हणजे या घटनाक्रमानंतर वैद्य या दोन्ही कुलूपाच्या चाब्या सोबत घेऊन गेल्या.

आॅडिटर तपासणीसाठी पोहचलेच नाहीत
खातेदारांनी गुरुवारी पोलिसांना सोबत घेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नागपूर शहर १ प्रकाश जगताप यांनी या पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करण्यासाठी सोमाजी साखरे, लेखा परीक्षक श्रेणी १ अंतर्गत जिल्हा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था, नागपूर यांची नियुक्ती केली. साखरे शुक्रवारी पतसंस्थेत पोहचून लेखापरीक्षणास सुरुवात करणार होते. मात्र, साखरे दिवसभर पोहचलेच नाहीत. खातेधारकांनी त्यांना संपर्क केला असता आपण दुसºया महत्त्वाच्या कामात व्यस्त असून शनिवारी तपासणीसाठी येऊ असे उत्तर त्यांनी दिले. यामुळे सहकार विभाग या पतसंस्थेच्या चौकशीसाठी किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.
संचालक मंडळ व एजंटचीही व्हावी चौकशी
पतसंस्थेचा व्यवस्थापक भोयर बेपत्ता आहे. मात्र, पतसंस्थेच्या ठेवी इतर बँकेत ठेवताना, आर्थिक व्यवहार करताना संचालक मंडळातील काही पदाधिकाºयांचीही स्वाक्षरी आवश्यक होती. पतसंस्थेत आर्थिक अपहार होत असताना अध्यक्षांसह संचालक मंडळ गप्प कसे राहिले. खातेधारकांकडून दररोज पैसा गोळा करणाºया एजंटच्या हे लक्षात कसे आले नाही. यापैकी कुणीही तक्रार का केली नाही, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. काही एजंट हे संचालक मंडळाच्या विश्वासातील असल्याची खातेधारकांची तक्रार आहे. या सर्वांची पोलीस व सहकार विभागाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी खातेधारकांनी केली आहे.

Web Title: The opposition opposes the opening of the office of 'Shakti Vahini'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.