एसटी बसच्या खासगीकरणाला विरोध ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:38+5:302021-06-09T04:08:38+5:30
नागपूर : एसटी बसच्या खासगीकरणाविरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने विरोध दर्शविला आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांसह संघटनेशी जुळलेल्या विविध ...
नागपूर : एसटी बसच्या खासगीकरणाविरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने विरोध दर्शविला आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांसह संघटनेशी जुळलेल्या विविध क्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी एसटी बसच्या खासगीकरणाविरोधात प्रदर्शन केले. कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात होत असलेल्या खासगीकरणाविरोधात हातावर काळी पट्टी बांधून आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि विभाग नियंत्रकांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन एसटी बसचे खासगीकरण रद्द करण्याची मागणी करण्यात आली. एसटी बसचे टप्प्याटप्प्याने खासगीकरण होत असल्याचे संघटनेने या पत्रात म्हटले असून, जेवढे खासगीकरण झाले ते रद्द करावे, पुढे होणारे खासगीकरण थांबवावे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५ कोटी अर्थसहाय्य देण्यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिष्टमंडळाचे नेतृत्व सिद्धार्थ बागडे यांनी केले. यावेळी अनिल नागरे, धर्मेश सहारे, मुकेश सोमकुवर, प्रेमराज बोबडे उपस्थित होते.
..........