मोदानी हटाव, धारावी बचाव; धारावीसाठी विरोधकांचे आंदोलन

By मंगेश व्यवहारे | Published: December 13, 2023 11:27 AM2023-12-13T11:27:29+5:302023-12-13T11:28:07+5:30

वर्षा गायकवाड यांनी धारावीमध्ये टीडीआरचा मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला

Opposition protest against Adani project in Dharavi in Vidhan Bhawan | मोदानी हटाव, धारावी बचाव; धारावीसाठी विरोधकांचे आंदोलन

मोदानी हटाव, धारावी बचाव; धारावीसाठी विरोधकांचे आंदोलन

नागपूर :  ‘मोदानी’ हटाव, धारावी बचाव अशा घोषणा देत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात कॉँग्रेस आणि विरोधा पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. आमदारांनी विधिमंडळ परिसरात मोर्चा काढून आंदोलन केले. ‘पन्नास खोके, एकदम ओके’, ‘ खोके सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’, ‘ अदानीला सूट, धारावीची लूट, ‘ धारावी वाचवा, लघुउद्योग वाचवा’, ‘ अदानीला सुटली धारावीची हाव’ अशाही घोषणा यावेळी देण्यात आल्या. दानवे यांच्याशिवाय, वर्षा गायकवाड, वैभव नाईक, रवींद्र वायकर व इतर आमदार या आंदोलनात सहभागी होते. 

दानवे यावेळी बोलताना म्हणाले की धारावीची मालकी मोदींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. धारावीत प्रत्येक घरी लघुउद्योग चालतो. या परिसराचे पुनर्वसन झाल्यास लघुउद्योगांचेही मोठे नुकसान होणार आहे. टीडीआरची मालकी अदानींना देऊन खोके सरकार अदानीची दलाली करते आहे, अशी टीका दानवे यांनी केली. 

वर्षा गायकवाड यांनी धारावीमध्ये टीडीआरचा मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला. निविदांचे निकष तसेच इतर नियम बदलण्यात आले. धारावीतील जागा रिकामी करण्यासाठी माजी पोलिस आयुक्तांकडून दबाव आणला जातो आहे. याशिवाय, गुंडांचेही साहाय्य घेतले जाते आहे. अदानींच्या फायद्यासाठी हा सगळा प्रकार होत असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या. 

Web Title: Opposition protest against Adani project in Dharavi in Vidhan Bhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.