नागपुरात महापौरांच्या खुर्चीवर बॅनर धरून विरोधकांची नारेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 11:00 PM2018-09-19T23:00:48+5:302018-09-19T23:04:05+5:30
महापौर नंदा जिचकार यांनी सॅनफ्रॅन्सिस्को दौऱ्यात त्यांचा मुलगा प्रियांशला त्यांनी खासगी सचिव म्हणून सोबत नेले आहे. यासाठी त्यांनी महापालिकेला खोटी माहिती देऊन चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची तसेच अमेरिकेची फसवणूक केली आहे. नैतिकतेचा पाठ शिकविणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी हा अनैतिक भ्रष्टाचार केला असल्याने महापौरांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी बुधवारी महापौर कक्षातील महापौरांच्या खुर्चीवर व्यंगचित्र काढलेले बॅनर धरून जोरदार नारेबाजी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापौर नंदा जिचकार यांनी सॅनफ्रॅन्सिस्को दौऱ्यात त्यांचा मुलगा प्रियांशला त्यांनी खासगी सचिव म्हणून सोबत नेले आहे. यासाठी त्यांनी महापालिकेला खोटी माहिती देऊन चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची तसेच अमेरिकेची फसवणूक केली आहे. नैतिकतेचा पाठ शिकविणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी हा अनैतिक भ्रष्टाचार केला असल्याने महापौरांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी बुधवारी महापौर कक्षातील महापौरांच्या खुर्चीवर व्यंगचित्र काढलेले बॅनर धरून जोरदार नारेबाजी केली.
अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को येथे हवामान व ऊर्जेच्या जागतिक बदलावर आधारित परिषद आयोजित करण्यात आली होती. यासाठी महापौरांना निमंत्रित करण्यात आले होते. महापौरांनी नियमानुसार महापालिका कार्यालयाच्या खासगी सचिवांना सोबत नेणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी तसे न करता स्वत:च्या मुलाला खासगी सचिव दर्शवून सोबत नेले. यासाठी त्यांनी खोटी माहिती दिल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी तानाजी वनवे व नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी केली. यावेळी महापौरांचे व्यंगचित्र असेलेले वेगवेगळे बॅनर्स झळकावण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी महापौरांच्या कक्षापुढे घोषणाबाजी केली. महापौरांनी राजीनामा न दिल्यास सभागृहात महापौरांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौरांच्या निष्क्रियतेमुळे नगरसेवकांना अद्याप विकास कामांसाठी निधी प्राप्त झालेला नाही. शहरातील समस्या मार्गी लागलेली नाही. पदाचा गैरवापर केल्यामुळे महापौरांनी नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. आंदोलनात नगरसेवक किशोर जिचकार, जुल्फेकार अहमद भुट्टो, दिनेश यादव, परसराम मानवटकर, मनोज गावंडे, हषंला साबळे, जिशान मुमताज इरफान अन्सारी, प्रणिता शहाणे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊ त, धीरज पांडे, शहर युवक काँग्रेसचे घनश्याम मांगे, महिला प्रदेश महामंत्री कांता पराते, निजामुद्दीन अन्सारी, विजय बाभरे, चंदू वाकोडकर, चंद्रप्रकाश शहाणे, अजित सिंग, अमीर नूरी, तनवीर विद्रोही, राजू महाजन, रजनी राऊ त, अर्चना गेडाम, बेबी गडेकर, अर्चना कापसे, संगीता उपेकर, अर्चना सिडाम, समशाद बेगम, सुनीता जिचकार आदींचा समावेश होता.