अदानींना लाभ नको... नागपूर आणि पुण्याचे क्षेत्र टोरंटला देण्यास विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 06:39 AM2022-11-30T06:39:32+5:302022-11-30T06:40:02+5:30
अदानींना लाभाचे विजेचे क्षेत्र देण्याविरोधात भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अदानीने मुंबईच्या जवळपासच्या क्षेत्रातील वीज वितरण प्रणाली सांभाळण्यास पुढाकार घेतल्यानंतर आता टोरंटने नागपूर व पुण्याची वीज वितरण प्रणाली सांभाळण्यासाठी दावा केला आहे. वीज कर्मचारी संघटन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने त्याला विरोध करून अदानी महावितरणच्या लाभ क्षेत्रावर डोळे ठेवून असल्याचा आक्षेप घेतला आहे.
अदानी मुलुंड, भांडूप, नवी मुंबई, पनवेल, खारघर, तळोजा व उरणमध्ये वीज वितरण करण्यास इच्छुक आहे. तेथून महावितरणला एक हजार कोटीचा महसूल मिळेल. त्यामुळे ही क्षेत्रे खासगी कंपन्यांना देऊ नयेत. अध्यक्ष मोहन शर्मा म्हणाले की, केंद्राचा आशीर्वाद कार्पोरेट कंपन्यांवर आहे. नेत्यांच्या परवानगीविना अदानी व टोरंटसारख्या कंपन्या असे प्रयत्न करू शकत नाही. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून खुलासा केला होता की मुंबईजवळील वीज वितरणाला अदानीला विद्युत नियामक आयोगाने सहमती दर्शविली.
ऊर्जाक्षेत्रात सत्ताधारी व विरोधकांचे राजकारण
शर्मांचा आरोप आहे की, सत्ता व विरोधक ऊर्जाक्षेत्रात राजकारण करीत आहेत. महाराष्ट्रात कृषिपंपाचे वीज कनेक्शनचे थकीत सप्टेंबर २०२२ मध्ये ४८,७१५ कोटींवर पोहोचले आहे. २०१४ मध्ये ही रक्कम एक हजार कोटी होती. सरकार व कंपनी व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे थकीत वाढले आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष वेधत, त्यांना मदत करण्याची मागणी केली आहे.