आरोग्य खात्याच्या कारभारावरून विरोधकांचा सभात्याग; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 12:24 PM2023-12-13T12:24:05+5:302023-12-13T12:25:55+5:30

दोन महिलांचा डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असा आरोप त्यांनी केला. 

Opposition walkout over health department's administration; Demand for Minister's resignation | आरोग्य खात्याच्या कारभारावरून विरोधकांचा सभात्याग; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

आरोग्य खात्याच्या कारभारावरून विरोधकांचा सभात्याग; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

नागपूर- गडचिरोली व बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीदरम्यान दोन महिलांचा मृत्यू झाला.याला आरोग्य खात्याचा हलगर्जीपणा कारणीभूत असून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. 

आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करत वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला .विधानसभेत प्रशोत्तराच्या तासादरम्यात झालेल्या चर्चेत वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाचे वाभाडे काढत जोरदार हल्लाबोल केला.गडचिरोली शहरातील जिल्हा स्त्री व बालरूग्णालयात सिझेरियन प्रसुतीनंतर रजनी प्रशांत शेडमाके व उज्वला नरेश बुरे या दोन महिलांचा डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असा आरोप त्यांनी केला. 

त्याचसोबत बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालय व अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालय या दोन्ही ठिकाणी उपचारासाठी आलेल्या विद्या निलेश गावंडे या तरुणीचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला.या प्रकरणी कडक कारवाईची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. 

Web Title: Opposition walkout over health department's administration; Demand for Minister's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.