पदवीधर निवडणुकीत हवा नोटाचाही पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:27 AM2020-11-24T00:27:43+5:302020-11-24T00:29:13+5:30
Graduate elections , NOTA, nagpur news पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार सध्या जोरावर आहे. सर्वच उमेदवार आपापल्या पद्धतीने कामाला लागले आहेत. प्रशासनही निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. यातच पदवीधर निवडणुकीतही नोटाचा पर्याय असायला हवा, अशी मागणी पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार सध्या जोरावर आहे. सर्वच उमेदवार आपापल्या पद्धतीने कामाला लागले आहेत. प्रशासनही निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. यातच पदवीधर निवडणुकीतही नोटाचा पर्याय असायला हवा, अशी मागणी पुढे आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेने यासंदर्भात विभागीय आयुक्त व मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांना निवेदन सादर केले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नोटाचा पर्याय उपलब्ध असताना विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत नोटा हा पर्याय उपलब्ध नसणे हा पदवीधर तसेच सुशिक्षित शिक्षक मतदारांच्या संवैधानिक अधिकारावर घाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यासोबतच पदवीधर नोंदणींमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून अनेक नावे ही वेगवेगळ्या यादीत दोन-तीन वेळा नोंदविण्यात आली आहेत. त्यामुळे सदर मतदार यादीची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिष्टमंडळात राज्य सरचिटणीस महेश जोशी, शरद भांडारकर, शहर सचिव घोडके, नितीन किटे, जावेद शेख व विश्वास रामटेककर यांचा समावेश होता.