नागपूर जिल्ह्यात शनिवारी ऑरेंज अलर्टचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2022 19:27 IST2022-08-19T19:26:39+5:302022-08-19T19:27:23+5:30
Nagpur News हवामान खात्याने नागपूर जिल्ह्याकरीता उद्या दिनांक २० ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्टचा इशारा जारी करत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

नागपूर जिल्ह्यात शनिवारी ऑरेंज अलर्टचा इशारा
नागपूरः हवामान खात्याने नागपूर जिल्ह्याकरीता उद्या दिनांक २० ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्टचा इशारा जारी करत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे बऱ्यापैकी भरलेले असून त्यातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येत आहे.
१. तोतलाडोह प्रकल्प (रामटेक) : ९२%
२. नवेगाव खैरी प्रकल्प (पारशिवनी) : ९०%
३. खिंडसी प्रकल्प (रामटेक): १००%
४. वडगाव प्रकल्प (उमरेड) : ९१%
५. नांद प्रकल्प (उमरेड): ६७%
मुसळधार पाऊस झाल्यास नदी व नाले दुथडी वाहून नदी काठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते .
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी आवश्यक काळजी व खबरदारी बागळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.