नागपूरकर रसिकांना दोन वर्षानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 12:27 PM2021-12-16T12:27:57+5:302021-12-16T12:40:25+5:30

ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १८ व १९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १८ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते होणार आहे.

orange city international film festival 2021 from december 18th | नागपूरकर रसिकांना दोन वर्षानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी

नागपूरकर रसिकांना दोन वर्षानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी

Next
ठळक मुद्देद्विदिवसीय ऑरेंज सिटी चित्रपट महोत्सव शनिवारपासून

नागपूर : ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनच्या वतीने पाचवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १८ व १९ डिसेंबरला आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सिस्टीमच्या कवी कुलगुरू कालिदास सभागृहात आयोजित करण्यात येत असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी पत्रपरिषदेत दिली.

ओसीआयएफएफचे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. परंतु, गेल्या २ वर्षापासून कोरोनामुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता. सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आणि राज्य सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीवर परवानगी दिल्यामुळे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी १८ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, चित्रपट अभ्यासक समर नखाते उपस्थित राहतील.

महोत्सवाची सुरुवात सकाळी १० वाजता 'कर्फ्यू' या इजिप्तच्या चित्रपटाने होणार आहे. महोत्सवात एकूण ८ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. त्यातील चार चित्रपट भारतातील तर चार चित्रपट परदेशातील राहतील. ५० टक्के उपस्थितीत होणाऱ्या या महोत्सवात मास्क अनिवार्य करण्यात आले असून कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. दर्शकांनी त्यासंदर्भात लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवायचे आहे.

नागपूरच्या ‘गोत’चे प्रदर्शन

चित्रपट महोत्सवात नागपूरचे दिग्दर्शक व निर्माते शैलेंद्र बागडे यांचा ‘गोत’ हा आदिवासी प्रथेवर आधारित चित्रपट १९ तारखेला प्रदर्शित केला जाणार आहे. यासोबतच नागपुरात कार्यरत असलेले आयकर सहआयुक्त विठ्ठल भोसले यांचा ‘फिरस्त्या’हा चित्रपटदेखील प्रदर्शित केला जाणार आहे. याशिवाय भारतातील ‘पीग’ व ‘कॉट’ हे दोन चित्रपट, जपानचा ‘टू मदर्स’, नॉर्वेचा ‘सिस्टर्स’, फ्रान्सचा ‘टूवर्डस द बॅटल’, इजिप्तचा ‘कर्फ्यू’ हे चित्रपट प्रदर्शित केले जातील.

Web Title: orange city international film festival 2021 from december 18th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.