Krazy Castle Accident: नागपुरातील क्रेझी कॅसल वॉटर पार्क तात्काळ बंद करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:40 AM2018-05-21T10:40:02+5:302018-05-21T10:40:09+5:30

क्रेझी कॅसल पार्कमध्ये घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, पोलीस या घटनेची संपूर्ण चौकशी करीत आहेत. हा पार्क तात्काळ बंद करण्यात आला असल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

An order to immediately close the criminal case of Castle Casal Water Park in Nagpur | Krazy Castle Accident: नागपुरातील क्रेझी कॅसल वॉटर पार्क तात्काळ बंद करण्याचा आदेश

Krazy Castle Accident: नागपुरातील क्रेझी कॅसल वॉटर पार्क तात्काळ बंद करण्याचा आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देघटनेतील दोषीवर कारवाई करण्याचे महापौर नंदा जिचकार यांचे आदेश


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रेझी कॅसल पार्कमध्ये घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, पोलीस या घटनेची संपूर्ण चौकशी करीत आहेत. त्या आधारावर कारवाई करण्यात येईल. तसेच घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा पार्क तात्काळ बंद करण्यात आला असल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
या घटनेची आम्ही गंभीरपणे दखल घेतली आहे. त्यासंदर्भात एसडीएम स्पॉटवर जाऊन कार्यवाही करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार ही प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली. मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला बाधा पोहोचू नये, यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने गेल्या १५ मे रोजी पार पडलेल्या बैठकीत क्रेझी कॅसल बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही जिल्हाधिकारी तथा नासुप्रचे सभापती अश्विन मुदगल यांनी सांगितले.
अंबाझरी येथील क्रेझी कॅसल येथे झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. घटनेची संपूर्ण शहानिशा करून जो दोषी असेल त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. क्रेझी कॅसलची लीज संपली आहे. त्यांना जागा सोडण्याची नोटीस बजाविण्यात असून, त्यांनी जागा रिकामी केली नाही. क्रेझी कॅसलवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले.

Web Title: An order to immediately close the criminal case of Castle Casal Water Park in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.