अवयवदानात मेयो, मेडिकलच्या मदतीसाठी मोहन फाऊंडेशन, नागपुरातील केंद्राचे लोकार्पण
By सुमेध वाघमार | Published: April 30, 2024 12:39 AM2024-04-30T00:39:31+5:302024-04-30T00:41:35+5:30
आतापर्यंत पाच ब्रेन डेड व्यक्तीकडून अवयवदान करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
नागपूर : मेयो, मेडिकलमध्ये ब्रेन डेड म्हणजे मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाचे समुपदेशन करून त्यांना अवयवदानासाठी पे्ररीत करण्यासाठी आता ‘मल्टी आॅर्गन हार्वेस्टिंग अॅड नेटवर्क’ (मोहन) फाऊंडेशनची मदत होणार आहे. या संदर्भातील सामंजस्य करार झाला असून मोहन फाऊंडेशन आपल्या कार्याला सुरूवातही केली आहे. आतापर्यंत पाच ब्रेन डेड व्यक्तीकडून अवयवदान करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
राजाबाक्षा येथील देवानी धर्मशाळा येथील ‘मोहन फाऊंडेशन’च्या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी पार पडले. यावेळी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, मोहन फाऊंडेशनचे ट्रस्टी भावना जगवानी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. बी.जी. वाघमारे, डॉ. व्ही. एल. गुप्ता, डॉ. अनिता सिंग, डॉ. समीर जहागीरदार, डॉ. अंजली भांडारकर, प्रताप दिवाणी, नरेंद्र सतीजा, डॉ. सुशील मेश्राम आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक मोहन फाउंडेशन, नागपूरच्या प्रकल्प व्यवस्थापक वीणा वाठोरे यांनी केले. १९७७ पासून भारतातील अवयवदानात फाऊंडेशनचे कार्य त्यांनी मांडले. डॉ. रवी वानखेडे यांनी आपल्या मुस्लीम मित्राला किडनी दान करून या कार्यात स्वत:ला झोकून दिले. २०१०पासून नागपुरातील फाऊंडेशनचे कार्य त्यांनी पुढे नेल्याची माहितीही वाठोरे यांनी दिली. अयवदान हे एक उदात्त कार्य असून अवयवदानाच्या निर्णयाने दुसºयाचे जीवन वाचू शकते, असे मत डॉ. गजभिये यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. वाघमारे यांच्या हस्ते अवयवदाता राकेश बारसागडे यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बुलु बेहरा व भाग्यश्री निघोट यांनी परिश्रम घेतले.