नागपुरात टँकर चालकांची संघटित गुन्हेगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:44 PM2019-04-15T22:44:35+5:302019-04-15T22:45:58+5:30

नॉन नेटवर्क भागातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने टँकर लावलेले आहेत. परंतु अनेक टँकर चालक नागरिकांकडून पैशाची वसुली करतात. बांधकामासाठी पिण्याचे पाणी विकतात. नर्सरी, बर्फाचे कारखाने, हॉटेल चालक यांना पाणीपुरवठा करतात. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली टँकर चालकांची संघटित गुन्हेगारी सुरू आहे. नागरिकांचे पाणी विकले जात असल्याने नॉन नेटवर्क भागातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.

Organized crime of tanker drivers in Nagpur | नागपुरात टँकर चालकांची संघटित गुन्हेगारी

नागपुरात टँकर चालकांची संघटित गुन्हेगारी

Next
ठळक मुद्देबांधकाम, नर्सरी व हॉटेल चालकांना पाण्याची विक्री : नागरिकांची मात्र पाण्यासाठी पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नॉन नेटवर्क भागातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने टँकर लावलेले आहेत. परंतु अनेक टँकर चालक नागरिकांकडून पैशाची वसुली करतात. बांधकामासाठी पिण्याचे पाणी विकतात. नर्सरी, बर्फाचे कारखाने, हॉटेल चालक यांना पाणीपुरवठा करतात. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली टँकर चालकांची संघटित गुन्हेगारी सुरू आहे. नागरिकांचे पाणी विकले जात असल्याने नॉन नेटवर्क भागातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.
सर्वाधिक टँकर असलेल्या उत्तर नागपूर, पूर्व व दक्षिण नागपुरात नागरिकांचे पाणी विकण्याचा प्रकार मागील काही वर्षांपासून सर्रास सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढल्याने टँकर चालक नागरिकांना वेठीस धरत आहेत. आसीनगर व मंगळवारी, नेहरूनगर, सतरंजीपुरा झोनमध्ये टँकर चालक पैशाची मागणी करीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
ड्रमभर पाण्यासाठी काही टँकर चालक ५० ते २०० रुपयांची मागणी करतात. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच जलप्रदाय समितीचे सभापती विजय झलके यांनी सोमवारी जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांना वर्षभरात किती टँकर चालकांवर कारवाई केली, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. पाण्यासाठी अधिक वसुली होत असलेल्या भागातच आपल्या टँकरच्या फेऱ्या सुरू व्हाव्यात, यासाठी लॉबिंग केले जाते. संबंधित झोनमधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनेक टँकर चालक पाणी विकण्याचा धंदा करीत आहेत.
- तर टँकर तात्काळ बंद करू
महापालिके ने शहरातील नॉन नेटवर्क भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर लावण्यात आले आहेत. पाण्यासाठी पैसे मागणाºया टँकर चालकावर तात्काळ कारवाई करून वर्षभरात किती टँकर चालकांवर कारवाई केली, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाला दिले आहेत. तसेच टँकर चालक पाण्यासाठी पैशाची मागणी करीत असेल तर थेट माझ्या मोबाईलवर नागरिकांनी संपर्क करावा, दोषी आढळल्यास असे टँकर तात्काळ बंद केले जातील.
विजय झलके, सभापती जलप्रदाय समिती

Web Title: Organized crime of tanker drivers in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.