स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:13 AM2021-08-17T04:13:42+5:302021-08-17T04:13:42+5:30
......... तहसील कार्यालय पारशिवनी पारशिवनी : शहरात कोविड नियमांचे पालन करीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय ...
.........
तहसील कार्यालय पारशिवनी
पारशिवनी : शहरात कोविड नियमांचे पालन करीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय येथे तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार के.आर. अल्लेवार, आर.जी. आडे, आर.आर. सयाम, एस.आर. पडोळे, पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, वीरेंद्र गजभिये, नगरसेवक विजय भुते, अनिता भड, आशा वैद्य, माजी जि. प. सदस्य कमलाकर मेंघर, प्रेम भोंडेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. नगर पंचायत येथे नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी अर्चना वंजारी-भिवगडे, उपाध्यक्ष माधुरी भिमटे, गटनेते सागर सायरे, नगरसेवक टिकाराम परतेकी, विजय भुते, ओमप्रकाश पालिवाल, अनिता भड, आशा वैद्य, रूपाली भड, अरुणा भिवगडे, निकिता गोन्नाडे आदींसह आशावर्कर, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. पंचायत समिती कार्यालय येथील ध्वजारोहण सभापती मीना प्रफुल्ल कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसभापती चेतन देशमुख, गटविकास अधिकारी अशोक खाडे, सहायक गटविकास अधिकारी चंद्रकांत देशमुख, इतर सदस्य व अधिकारी उपस्थित होते. पाेलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी ध्वजाराेहण केले. या वेळी पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समिती येथील ध्वजारोहण सभापती अशोक चिखले यांच्या हस्ते झाले. महात्मा गांधी महाविद्यालयात पुरुषोत्तम धोटे, राणी लक्ष्मीबाई विद्यालयात पालक संचालक कोमलचंद राऊत यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले.