काटोल-नरखेड तालुक्यात नि:शुल्क रोगनिदान शिबिरांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:12 AM2021-08-20T04:12:13+5:302021-08-20T04:12:13+5:30
या शिबिरात नागपूर येथील लता मंगेशकर हाॅस्पिटलच्या जनरल मेडिसीन, शल्य-चिकित्सा, बालरोग, अस्थिरोग, प्रसुती/स्त्रीरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, छातीरोग, दंतरोग व ...
या शिबिरात नागपूर येथील लता मंगेशकर हाॅस्पिटलच्या जनरल मेडिसीन, शल्य-चिकित्सा, बालरोग, अस्थिरोग, प्रसुती/स्त्रीरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, छातीरोग, दंतरोग व चर्मरोगांसहित इतर सर्व रोगांच्या रुग्णांची विशेष तज्ज्ञाद्वारे निःशुल्क तपासणी व औषध वितरण करण्यात येईल. यासोबतच आवश्यकता भासल्यास संबंधित रुग्णाला नागपूर येथे उपचारासाठी दखल करून घेतले जाईल. या शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक डॉ आशिष देशमुख यांनी केले आहे. सकाळी १० ते दुुपारी २ वाजेपर्यंत नियोजित स्थळी शिबिर होतील.
शिबिरांचे वेळापत्रक-
२१ ऑगस्ट - संत कबीर विद्यालय, सोनोली.
२५ ऑगस्ट - सांस्कृतिक भवन, भिष्णूर.
२८ ऑगस्ट - जि.प.प्राथमिक शाळा, लाडगाव.
०२ सप्टेंबर - जि.प. प्राथमिक शाळा, खैरगाव.
०८ सप्टेंबर- जि. प. प्राथमिक शाळा, पुसागोंदी.