गुरुपौर्णिमेनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:07 AM2021-07-24T04:07:18+5:302021-07-24T04:07:18+5:30
जलालखेडा : गुरुपाैर्णिमेनिमित्त जलालखेडा (ता. नरखेड) येथील एस. आर. के. इंडो पब्लिक स्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची वेशभूषा, निबंध, शुभेच्छा ...
जलालखेडा : गुरुपाैर्णिमेनिमित्त जलालखेडा (ता. नरखेड) येथील एस. आर. के. इंडो पब्लिक स्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची वेशभूषा, निबंध, शुभेच्छा कार्ड व शिक्षक-विद्यार्थी स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयाेजन करण्यात आले हाेते. यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हाेता.
इयत्ता पहिली ते चाैथीच्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा व निबंध स्पर्धा, इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा कार्ड व शिक्षक-विद्यार्थी स्पर्धा आयाेजित केली हाेती. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वेशभूषा करून इतरांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले. काहींनी उत्कृष्ट शुभेच्छा कार्ड तयार केले. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांवर निबंध लेखन केले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपसात संवाद साधला. या स्पर्धेत सारांश शुक्ला, मानवी मिश्रा, तेजस्वी दामेधर, मनस्वी काळे, परिणीती खडसे, आराध्य लाड, श्रावणी त्रिपाठी, गार्गी सोनोने, आयेशा शेख, चंचल धर्मे, रुद्रानी चरडे, मधुरा पाटील, अरिषा खान, यश चरपे, साहिल थोटे, शंतनू लोहे, वंश अंतूरकर, चंचल गोरे, अंजली देवासे, चैताली अंतूरकर, अनुश्री कळंबे, नमन पोटपिटे, समिक्षा राठोड, निष्ठा काकडे, गुंजन ठाकरे, भाविका भाकरे, दिव्यांका भाकरे, वैशाली चापले, श्रेया ठाकरे, प्राजक्ता नाडेकर, सोनाली कांबळे, आयुषी लोहे, सलोनी त्रिपाठी, मनस्वी हिवरकर, यशस्वी बारापात्रे, लावण्या रुद्रकर, तनुश्री मानमोडे, लावण्या सोनकुसळे, वेदांत देशमुख, आचल नागमोते, सोनाली खजुरिया, अथर्व जांभूळकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हाेता.
230721\img_20210723_125738.jpg
फोटो ओळी. शिक्षकाची वेशभूषा करून विद्यार्थांना ऑनलाईन पद्धतीने शिकवताना वर्ग १ ली ची विद्यार्थिनी रुद्रानी चरडे.