साैर कृषिपंप याेजना ठरतेय आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:32+5:302021-06-17T04:07:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : वीज वापराचा खर्च वाचावा साेबतच वीज वाहिनी गेलेली नसलेल्या शेतकऱ्यालाही पंप मिळावा, यासाठी शासनाने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : वीज वापराचा खर्च वाचावा साेबतच वीज वाहिनी गेलेली नसलेल्या शेतकऱ्यालाही पंप मिळावा, यासाठी शासनाने साैर कृषिपंप याेजना सुरू केली. यामुळे सिंचन सुविधा उपलब्ध झाली असून, ही याेजना शेतकऱ्यांसाठी माेठा आधार ठरत आहे. या याेजनेमार्फत कळमेश्वर तालुक्यात २७ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, अर्ज स्वीकारणे सुरू आहे, अशी माहिती उपकार्यकारी अभियंता पंकज हाेनाडे यांनी दिली.
सिंचन विहिरी, शेततळी, बंधारे आदीच्या माध्यमातून शासनाने सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र पाण्याचा उपसा होण्यासाठी साधन असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून कृषिपंपाची वीज जोडणी दिली जात होती. यात काही शेतकऱ्यांच्या शेतात मुख्य वीज वाहिनीपासून बरेच दूर अंतर असल्याने वीज जोडणी देणे शक्य होत नव्हते. शिवाय, शेतकऱ्यांना रात्रीची वीज उपलब्ध करून दिल्या जात होती. या सर्व अडचणीपासून सुटका करण्यासाठी शासनाने सौर कृषिपंप ही योजना मागील तीन वर्षांपासून सुरू केली आहे.
या योजनेमध्ये अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप लावले जात आहे. सौर कृषिपंप व्यवस्थित पाण्याचा उपसा करणार नाही, अशी शंका शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्ष वापर करताना हा पंप विजेवर चालणाऱ्या पंपाप्रमाणेच काम करीत आहे.
ज्या शेतकऱ्यांना विहिरीवर नव्याने कनेक्शन घ्यायचे आहे. परंतु वीज वाहिनीपासून विहिरीचे अंतर लांब राहत असल्याने वीज जाेडणीसाठी येणारा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची शेती कोरडवाहू स्वरूपात राहत होती. मात्र सौर कृषिपंप लावल्याने विजेची गरज भासत नाही. शेतकऱ्याला विजेचे बिलही येत नाही. या पंपाची पाच वर्षे देखभाल ठेवण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर साेपविली आहे.
...
सौर कृषिपंपासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागताे. शेतात सिंचनाची साेय असणे आवश्यक आहे. पाच हेक्टरपर्यंत शेती असल्यास तीन एचपीचा पंप दिला जातो तर पाच हेक्टरपेक्षा अधिक शेती असल्यास पाच एचपीचा पंप दिला जातो. अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्के तर इतर लाभार्थ्यांना १० टक्के रक्कम भरावी लागते. महावितरणच्या तालुका स्तरावरील कार्यालये तसेच इतरही कार्यालयामध्ये याबाबतची माहिती उपलब्ध आहे.
- पंकज होनाडे, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, उपविभाग कळमेश्वर.