हाेळीच्या काळात अन्य सेवा बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:09 AM2021-03-23T04:09:57+5:302021-03-23T04:09:57+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : हाेळीच्या काळातील तीन दिवस अत्यावश्यक सेवा व दुकाने वगळता अन्य सेवा व दुकाने पूर्णपणे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : हाेळीच्या काळातील तीन दिवस अत्यावश्यक सेवा व दुकाने वगळता अन्य सेवा व दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. या काळात विनाकारण राेडवर फिरणाऱ्यांना पाेलीस कारवाईला सामाेरे जावे लागेल, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली.
रामटेक शहर व तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात रविवारी (दि. २१) ४१ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली हाेती. काेराेना संक्रमण राेखण्यासाठी २२ ते ३१ मार्च या काळात ग्रामीण भागातून नागपूर शहरात महत्त्वाची कामे वगळता इतर कामांसाठी जाण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. या काळात सर्व दुकाने व सेवा राेज सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, हाेळीच्या काळातील २७, २८ व २९ मार्च राेजी केवळ अत्यावश्यक सेवा व दुकाने सुरू राहणार असून, इतर सेवा व दुकाने बंद राहणार आहेत, असेही बाळासाहेब मस्के यांनी सांगितले. या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये किंवा रस्त्याने फिरू नये. उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ व ५६ तसेच भारतीय संहिता कलम १८८ अन्वये दंडात्मक व पाेलीस कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. हाेळी व धूलिवंदन हे सण घरच्या घरीच साजरे करावे, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले आहे.