संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणे हीच आपली संस्कृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:12 AM2021-05-05T04:12:03+5:302021-05-05T04:12:03+5:30
वाडी: कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणाही कोलमडून पडली आहे. उपचारासाठी बेड, ऑक्सिजन, डॉक्टर्स, औषधीसाठी गरिबांसोबत श्रीमंतही ...
वाडी: कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणाही कोलमडून पडली आहे. उपचारासाठी बेड, ऑक्सिजन, डॉक्टर्स, औषधीसाठी गरिबांसोबत श्रीमंतही भटकत आहे. अशा संकटसमयी युवासेनेने वाडीत ४५ बेडचे सुविधायुक्त कोविड केअर सेंटर निर्माण केले. संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणे हीच भारतीय संस्कृती असल्याचे प्रतिपादन खासदार कृपाल तुमाने यांनी केले.
शिवसेना, युवासेना यांच्या सहकार्याने वाडी येथे नक्षत्र हॉस्पिटलच्यावरच्या माळ्यात स्व.मीनाताई बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन तुमाने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. हदयनाथ मार्कंड, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल काकडे, विधानसभा संघटक संतोष केचे, संजय अनासाने, रूपेश झाडे, शहरप्रमुख मधू माणके पाटील, विजय मिश्रा, युवासेना जिल्हा सरचिटणीस कपील भलमे, युवासेना तालुकाप्रमुख अखिल पोहणकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या परवानगीनुसार सध्या ४५ खाटांचे हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात २५ बेड उपचार प्रक्रियेसाठी तयार आहे. सर्वच बेड ऑक्सिजनयुक्त असून, सहा सेमी व्हेंटिलेटर्स येथे उपलब्ध असल्याची माहिती हर्षल काकडे यांनी दिली.