नागपूर विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी ७ कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 08:53 PM2019-05-30T20:53:24+5:302019-05-30T20:57:01+5:30

पाण्याच्या बाबतीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी गोसेखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा, पुजारी टोला बावनथडी आणि तोतलाडोह यासाारखे सात मोठे प्रकल्प कोरडे पडले आहेत. यात ० टक्के साठा आहे. तर उर्वरित धरणात केवळ ६ टक्के इकता पाणीसाठा आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात भयावह स्थिती आहे.

Out Of the 18 major projects in the Nagpur division, 7 dry | नागपूर विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी ७ कोरडे

नागपूर विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी ७ कोरडे

Next
ठळक मुद्देपाच वर्षातील सर्वात भयावह स्थितीधरणांमध्ये केवळ ६ टक्के पाणी साठा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाण्याच्या बाबतीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी गोसेखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा, पुजारी टोला बावनथडी आणि तोतलाडोह यासाारखे सात मोठे प्रकल्प कोरडे पडले आहेत. यात ० टक्के साठा आहे. तर उर्वरित धरणात केवळ ६ टक्के इकता पाणीसाठा आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात भयावह स्थिती आहे.
नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला (३० मे रोजी) केवळ २०१ दलघमी (६ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जलसंपदा विभगाने जारी केलेल्या अहवालानुसार एकूण १८ पैकी ७ प्रकल्प कोरडे आहेत. यामध्ये ० टक्के इतका पाणीसाठा आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात ० टक्के इतका पाणीसाठा आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३५ दलघमी (२५ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीसमध्ये ८ टक्के, लोवर नांद ० टक्के, वडगाव प्रकल्पात १३ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात १७ टक्के, सिरपूर १९ टक्के, पुजारी टोला ० टक्के, कालिसरार ४९ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये ३ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात २८ टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १२ टक्के, धाममध्ये ४ टक्के, पोथरामध्ये ० टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ४ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ व बावनथडीमध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.
पाच वर्षातील स्थिती
वर्ष (३० मे रोजी) नोंदवलेला पाणीसाठा
२०१९- २०१ दलघमी
२०१८ - ३९७ दलघमी
२०१७ - ३२३ दलघमी
२०१६ - ७३० दलघमी
२०१५- ७९६ दलघमी
२०१४ - १५२० दलघमी

मध्यम व लघु प्रकल्पातील स्थितीही भयावह
नागपूर विभागातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची स्थितीही अतिशय बिकट आहे. विभागात एकूण ४० मध्यम प्रकारचे धरण आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३७८ दलघमी इतकी आहे. त्यात ३० मे रोजीपर्यंत केवळ ६४ दलघमी म्हणजेच १२ टक्के इतका साठा शिल्लक आहे. तीच परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे. नागपूर विभागात एकूण ३१४ लघु प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठा क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ४१ दलघमी म्हणजेच आठ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे. मोठ्या अणि लघु प्रकल्पात तर मृतसाठ्यापेक्षाही कमी साठा आहे. मोठ्या प्रकल्पातील एकूण मृतसाठा हा किमान ९२० दलघमी असायला हवा. परंतु त्यात केवळ २०१ दलघमी इतके पाणी आहे. तर लघु प्रकल्पाचा एकूण मृतसाठा हा १६ दलघमी इतका आहे. यात आजच्या घडीला एकूण केवळ ४१ दलघमी इतकाच साठा शिल्लक आहे.

Web Title: Out Of the 18 major projects in the Nagpur division, 7 dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.