८ वर्षात अतिवृष्टीच्या नुकसानीचे ४२२ कोटीपैकी मिळाले फक्त ३२ कोटी --- जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:11 AM2021-09-12T04:11:23+5:302021-09-12T04:11:23+5:30
ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पारशिवनी तालुक्यातील माहुली गावात नदीवर बांधलेला पूल पडला. या पुलामुळे पुलापलीकडील अनेक गावांचा संपर्क ...
ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पारशिवनी तालुक्यातील माहुली गावात नदीवर बांधलेला पूल पडला. या पुलामुळे पुलापलीकडील अनेक गावांचा संपर्क तुटला. उन्हाळ्यात लोक कसेबसे जाणे-येणे करतात. पण पावसाळ्यात ५ ते १० किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. शहरात एकीकडे मोठमोठे उड्डाणपूल बांधले जात आहेत. गावातील महत्त्वाचे रस्ते पूल यासाठी वर्षभर निधी उपलब्ध होत नाही, ही शोकांतिका आहे.
चेतन देशमुख, उपसभापती, पंचायत समिती, पारशिवनी
- अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पाठविले प्रस्ताव
वर्ष दुरुस्ती प्रस्ताव (कोटी) मिळाले (कोटी)
२०१३-१४ १५८ ३२
२०१५-१६ ५०.६७ -
२०१६-१७ ८३.५६ -
२०१९-२० ६०.०९ -
२०२०-२१ ७०.३८ -
- मी उपाध्यक्ष असताना दोनवेळा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यात रस्ते, पूल नादुरुस्त झाले. दोन्ही वेळी आम्ही शासनाकडे दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविला. त्याचा फाॅलोअपसुद्धा घेतला. पण निधी उपलब्ध झाला नाही.
शरद डोणेकर, माजी उपाध्यक्ष, जि.प.