बियाणांसाठी ७,३३१ अर्जांतून ३,३०२ शेतकऱ्यांचेच नशीब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:09 AM2021-06-09T04:09:01+5:302021-06-09T04:09:01+5:30
नागपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणांसाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदविलेल्या मागणी अर्जांची लॉटरी निघाली आहे. सोयाबीन आणि तूर बियाणांच्या ...
नागपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणांसाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदविलेल्या मागणी अर्जांची लॉटरी निघाली आहे. सोयाबीन आणि तूर बियाणांच्या मागणीसाठी जिल्ह्यातून ७,३३१ अर्ज आले असले तरी लॉटरीमध्ये फक्त ३,३०२ शेतकऱ्यांचेच समाधान झाले आहे. यातही तुरीची मागणी करणाऱ्या बहुतेकांना समाधानकारक लाभ झाला आहे.
नागपूर जिल्ह्यात यंदा अधिक भर सोयाबीनवर दिसत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (गळीत धान्य) मध्ये शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या बियाणात सोयाबीनला प्राधान्य देेणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा अधिक आहे. सोयाबीनसाठी ६,४८९ शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केली होती. त्यातील फक्त २,४७८ शेतकऱ्यांना लॉटरी लागली. तर, तुरीच्या वाणासाठी ८४२ शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्यापैकी ८२४ शेतकऱ्यांना लॉटरी लागली.
...
अनुदानित बियाणांसाठी आलेले अर्ज - ७,३३१
लॉटरी किती जणांना - ३,३०२
...
२) कोणत्या तालुक्यात किती?
नागपूर : ७१
हिंगणा : ६८
सावनेर : ७९
कामठी : ११७
कळमेश्वर : १६१
काटोल : ५२६
नरखेड : ६००
पारशिवणी : १०८
मौदा : १८३
रामटेक : १०
कुही : २२४
उमरेड : ५७५
भिवापूर : ५८०
एकूण : ३३०२
...
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
१) अनुदान किती मिळणार हे स्पष्ट नाही
दरवर्षी खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाणावर अनुदान मिळते. यंदाही खरिपासाठी आम्ही नोंदणी केली असली तरी अनुदान किती हे स्पष्ट नाही. यामुळे शेतकरी संभ्रमात होते. यावर्षी दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना सवलत हवी आहे.
- डुंमदेव नाटकर, नेरी
२) लाभ तंत्रस्नेहींनाच, खरे गरजू वंचितच
महाडीबीटी पोर्टलवरून लाॅटरी पद्धतीने होणारी निवड पद्धत अयोग्य आहे. तंत्रस्नेही उच्च शिक्षित शेतकऱ्यांना याचा लाभ अधिक असून गरजू व गरीब शेतकरी वंचित राहणार आहेत. बियाणे वेळेवर मिळेलच याची खात्री नाही. परिणामत: उधारीवर खरेदी करावी लागणार आहे.
- सुरेश मारोतराव बादंरे, खरसोली
३) महाडीबीटी पाेर्टलवर लाॅटरी पद्धती असल्याने हमी नाही. यामुळे अर्जच दाखल केला नाही. आधी खर्च करा व नंतर अनुदान बँकेत जमा हाेणार, असे यात आहे. निश्चित काल मर्यादाही नाही. कृषी केंद्रावरून उधारीवर खरेदीची सोय असल्याने ते सोईचे आहे.
- धनराज झाडे, महादुला
...