घरगुती वादातील संतापापायी ‘तो’ उठला स्वत:च्याच जीवावर
By योगेश पांडे | Updated: May 10, 2023 16:35 IST2023-05-10T16:33:44+5:302023-05-10T16:35:31+5:30
Nagpur News घरातील भांडणांमुळे दोन अल्पवयीनांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजेच असताना घरातील वादामुळे आणखी एक जीव गेला आहे. एका व्यक्तीने घरगुती वादातून संताप अनावर झाल्याने स्वत:चा जीव दिला.

घरगुती वादातील संतापापायी ‘तो’ उठला स्वत:च्याच जीवावर
योगेश पांडे
नागपूर : घरातील भांडणांमुळे दोन अल्पवयीनांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजेच असताना घरातील वादामुळे आणखी एक जीव गेला आहे. एका व्यक्तीने घरगुती वादातून संताप अनावर झाल्याने स्वत:चा जीव दिला. त्याने अगोदर किटकनाशक प्राशन केले व त्यानंतर हातावर ब्लेडने वार केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
प्रवीण वामनराव तिजारे (४३, जुना कैलास नगर) असे मृतकाचे नाव आहे. घरगुती वादातून त्यांच्या मनात राग धुमसत होता. त्यांनी कुणाजवळही मनातील सल व्यक्त न करता रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास विषारी किटकनाशक केले. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या डाव्या हातावर चिरे मारून जखमा करून घेतल्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी मेडिकल इस्पितळातील वॉर्ड क्रमांक ५२ येथे दाखल केले. बुधवारी मध्यरात्री एक वाजेनंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.