आऊटर रिंग रोड सब कॉन्ट्रॅक्टरने केला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:09 AM2021-09-19T04:09:27+5:302021-09-19T04:09:27+5:30

वसीम कुरैशी नागपूर : आऊटर रिंग रोडचे काम करणाऱ्या सब कॉन्ट्रॅक्टरने मूळ कंत्राटदार कंपनीकडून पेमेंट न झाल्याने गोंडखैरी ते ...

Outer ring road closed by sub-contractor | आऊटर रिंग रोड सब कॉन्ट्रॅक्टरने केला बंद

आऊटर रिंग रोड सब कॉन्ट्रॅक्टरने केला बंद

Next

वसीम कुरैशी

नागपूर : आऊटर रिंग रोडचे काम करणाऱ्या सब कॉन्ट्रॅक्टरने मूळ कंत्राटदार कंपनीकडून पेमेंट न झाल्याने गोंडखैरी ते जामठा दरम्यान अंडरपासवर बांधकामाचे साहित्य ठेवून त्याला कुलूप लावले आहे. त्यामुळे रस्ता बंद झाला असून, गावकऱ्यांना त्याचा त्रास होत आहे.

आऊटर रिंग रोडचे काम करणारी एमईपीडीएल कंपनीला दोनवेळा एक्सटेन्शन देण्यात आले आहे. असे असतानाही एमईपीडीएल कंपनीने गोंडखैरी ते जामठा दरम्यान असलेल्या संगमगाव अंडरपासचे काम सब कॉन्ट्रॅक्टरला दिले होते. पण सब कॉन्ट्रॅक्टरला कामाचे पेंमेंट केले नाही. त्यामुळे सब कॉन्ट्रॅक्टरने आपले बांधकामाचे साहित्य रस्त्यावर ठेवून रस्ताच बंद केला आहे.

बऱ्याच वर्षांपासून काम सुरू असतानाही अर्धवट कामामुळे रिंग रोड आता खराब झाला आहे. शनिवारी संगमगावाजवळ एक ट्रक पलटला तर खडगावजवळ एक ट्रक चिखलात फसला. संगमगावाजवळ झालेल्या घटनेमुळे व आऊटर रिंग रोड खराब असल्याने चार किलोमीटर वाहतूक खोळंबली होती. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, संगमगावची समस्या जाणून घेण्यासाठी एनएचएआयचे अधिकारी आढावा घेण्यासाठी येत होते. परंतु रस्त्यावरील वाहनांची लांबच लांब रांग व तणावाची स्थिती बघून ते माघारी परतले.

- रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचा पुढाकार

आऊटर रिंग रोडच्या झालेल्या दुरवस्थेकडे विभागाचे अथवा लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी घेतली आहे. रविवारी सुमठाणा, गोतेवाडा, गुमगाव गावकरी खड्डे बुजविणार आहे. या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनाचे संतुलन बिघडत असल्याने अपघात वाढले आहेत.

Web Title: Outer ring road closed by sub-contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.