बंदी असलेले ‘लीळाचरित्र’ पंतप्रधान माेदींना भेट दिल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 07:51 PM2022-06-28T19:51:28+5:302022-06-28T19:55:06+5:30

Nagpur News पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना देहू येथील भेटीदरम्यान सुदर्शन कपाटे या व्यक्तीने बंदी असलेला वि. भि. काेलते संपादित आक्षेपार्ह ‘लीळाचरित्र’ ग्रंथ भेट दिल्याचा आराेप अखिल भारतीय महानुभाव महामंडळाने केला आहे.

Outraged in Mahanubhav mahamandal, for gifting banned 'Leelacharitra' to PM | बंदी असलेले ‘लीळाचरित्र’ पंतप्रधान माेदींना भेट दिल्याने संताप

बंदी असलेले ‘लीळाचरित्र’ पंतप्रधान माेदींना भेट दिल्याने संताप

googlenewsNext
ठळक मुद्दे पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रारमहानुभाव पंथीयांमध्ये असंताेष

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना देहू येथील भेटीदरम्यान सुदर्शन कपाटे या व्यक्तीने बंदी असलेला वि. भि. काेलते संपादित आक्षेपार्ह ‘लीळाचरित्र’ ग्रंथ भेट दिल्याचा आराेप अखिल भारतीय महानुभाव महामंडळाने केला आहे. हा ग्रंथ महानुभाव धर्माचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांची बदनामी करणारा असून, राज्य शासनाने त्यावर यापूर्वीच बंदी घातली आहे,असे असताना थेट पंतप्रधानांना हा ग्रंथ भेट दिल्याने महानुभाव धर्मीयांमध्ये असंताेष पसरला आहे.

अ. भा. महानुभाव महामंडळाने याबाबत पंतप्रधान कार्यालयात तक्रार केली असून, दाेषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे. सुदर्शन कपाटे यांनी थेट पंतप्रधानांची दिशाभूल करण्याचा कुप्रयत्न केला असल्याचा आराेप महामंडळाच्या अध्यक्ष तृप्ती बाेरकुटे यांनी केला. डाॅ. वि. भि. काेलते यांनी हेतूपुरस्सरपणे चक्रधर स्वामींची बदनामी करणारा ग्रंथ प्रकाशित केला. शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने १९७८ व १९८२ ला या ग्रंथाचे प्रकाशन केले हाेते. त्यानंतर महानुभाव धर्मीयांनी या ग्रंथाच्या विराेधात शासन स्तरावर व न्यायालयापर्यंत रान पेटविले हाेते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने शासकीय प्रकाशनावर स्थगिती व नंतर कुठल्याही प्रकाशनावर बंदीचे आणि प्रकाशित ग्रंथाच्या जप्तीचे आदेश दिले हाेते. उच्च न्यायालयानेही या ग्रंथावर बंदी व जप्तीचे आदेश दिले आहेत.

असे असताना समाजकंटकांकडून या ग्रंथाच्या प्रती विविध प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित करण्याचा वारंवार प्रयत्न राजराेसपणे हाेत असल्याचा आराेप तृप्ती बाेरकुटे यांनी केला आहे. शासनाचे बंदी आदेश कायम असताना शासकीय व प्रशासकीय पदाधिकाऱ्यांना हा ग्रंथ सार्वजनिक स्वरूपात भेट देणे गुन्हेगारी स्वरूपात माेडते. अशी कृती करणाऱ्यांचा जाहीर निषेध महामंडळाकडून करीत असून, याबाबत सखाेल चाैकशी करून सुदर्शन कपाटे व सर्व दाेषींवर कठाेर करवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

Web Title: Outraged in Mahanubhav mahamandal, for gifting banned 'Leelacharitra' to PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.