५ हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 10:56 AM2021-10-22T10:56:59+5:302021-10-22T11:02:40+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या काळात गहू आणि हरभऱ्यासह संत्रे व माेसंबीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. कृषिपंप कनेक्शन कापल्याने हे शेतकरी संकटात सापडले आहेत.

over 5000 farmers electricity connection were cut off by mseb | ५ हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले

५ हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले

googlenewsNext
ठळक मुद्देएचव्हीडीएस कनेक्शनचे ६१७ ट्रान्स्फाॅर्मर केले बंद : १७९४९ शेतकऱ्यांनी भरले २१.५५ काेटी

कमल शर्मा

नागपूर : महावितरणने जिल्ह्यातील ५००० शेतकऱ्यांच्या कृषि पंपाचे वीज कनेक्शन कापले. जवळपास ९२ हजार कृषिपंप कनेक्शनवर ४५० काेटी रुपये थकबाकी असल्याने महावितरणने वीज कनेक्शन कापण्याचे पाऊल उचलून शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. यादरम्यान एचव्हीडीसी कनेक्शनचे ६१७ ट्रान्स्फाॅर्मरही बंद करण्यात आले.

शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणने महाकृषी पंप वीज धाेरण कार्यान्वित केल्यानंतरही ही परिस्थिती आहे. या धाेरणानुसार मूळ थकबाकीच्या ५० टक्के भरल्यास व्याज आणि दंड माफ करण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यातील १७९४९ शेतकऱ्यांनी २१.५५ काेटी रुपये भरून याेजनेचा लाभ घेतला आहे. याेजनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शेतकऱ्यांनी चालू बिल भरले नसल्यास त्यांची वीज धडाक्याने कापली जात आहे. अनेक ठिकाणी ट्रान्स्फाॅर्मरच बंद करण्यात आल्याची माहिती आहे. 

महावितरणने याबाबत आकडे उपलब्ध केले नसले तरी ट्रान्स्फाॅर्मर खराब झाल्यानंतरही दुरुस्त केले जात नसल्याचे दावे शेतकऱ्यांनी केले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी आधी थकबाकी भरावी, नंतरच दुरुस्ती केली जाईल, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे एचडीव्हीसी अंतर्गत जिल्ह्यात २४०० शेतकऱ्यांना कृषिपंप देण्यात आले आहेत. थकीत वसुली अभियानांतर्गत महावितरणने यातील ६१७ ट्रान्स्फाॅर्मर बंद केले.

सिंचनासाठी पाण्याची गरज

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या काळात गहू आणि हरभऱ्यासह संत्रे व माेसंबीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. कृषिपंप कनेक्शन कापल्याने हे शेतकरी संकटात सापडले आहेत. पुढच्या १५ दिवसात कापूस व तुरीच्या पिकासाठीही पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे पाण्याविना पीक खराब हाेण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

शेतकऱ्यांनाे वीज बिल भरा : महावितरण

महावितरणचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी, कंपनीची आर्थिक स्थिती बिघडल्याने थकबाकी वसूल करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी थकबाकी भरून कंपनीला सहकार्य करावे, जेणेकरून राज्यात वीजपुरवठा अबाधित राहील. शेतकऱ्यांनी महाकृषी पंप वीज धाेरणाचा लाभ घेऊन स्वत:ला थकबाकीमुक्त करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: over 5000 farmers electricity connection were cut off by mseb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.