८ हजारांवर कर्मचारी सांभाळतात नागपूर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2023 08:53 PM2023-01-02T20:53:21+5:302023-01-02T20:56:55+5:30

Nagpur News शहरात दररोज १२५० मेट्रिक टन कचरा निघतोय. हा संपूर्ण कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये साठवला जातो.

Over 8 thousand employees are responsible for the cleanliness of Nagpur city | ८ हजारांवर कर्मचारी सांभाळतात नागपूर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी

८ हजारांवर कर्मचारी सांभाळतात नागपूर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी

googlenewsNext
ठळक मुद्देदररोज निघतोय १२५० मेट्रिक टन कचरा मॅनहोलची सफाई होते रोबोटने

नागपूर : सुंदर नागपूर, स्वच्छ नागपूर ठेवण्याची जबाबदारी ८ हजार कर्मचाऱ्यांवर आहे. यातील ६ हजार कर्मचारी हे महापालिकेचे सफाई कामगार असून, खासगी कंपन्यांच्या माध्यमातून २ हजार कर्मचारी हे कचरा संकलनाच्या कार्यात आहेत. शहरात दररोज १२५० मेट्रिक टन कचरा निघतोय. हा संपूर्ण कचरा भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये साठवला जातो.

कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी ४५० वाहने

महापालिकेचे सफाई कर्मचारी हे शहरातील महापालिकेच्या हद्दीतील वस्त्यांमध्ये रस्त्यांची सफाई करतात. तर घराघरातून कचरा संकलनाची जबाबदारी एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपनीवर सोपविली आहे. दोन्ही कंपन्यांना शहरातील दहाही झोन वाटून दिले आहे. या कंपन्यांंकडे असलेल्या ४५० वाहनांमधून घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यात येते आणि या कचऱ्याची वाहतूक भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये केली जाते.

- आठ हजार कर्मचाऱ्यांचे राबतात हात

महापालिकेचे सफाई कामगारांची संख्या ६ हजारांवर आहे. तर २ हजार कर्मचारी हे कचरा गोळा करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदार कंपन्याचे आहे. या कर्मचाऱ्यांमुळे शहरातील स्वच्छता अबाधित राहते.

-दररोज १२०० मेट्रिक टन कचरा

महापालिकेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरातील दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निघतोय. हा कचरा भांडेवाडीमध्ये साठवला जातो. घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी येणारी वाहने ओला कचरा, सुका कचरा गोळा करीत आहेत.

- काही प्रमाणात यांत्रिक पद्धत

शहरातील स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे आहे. तर शहरातील गटारी स्वच्छतेची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाकडे आहे. शहरात आता तुंबलेले गटारीचे चेंबरमधील गाळ करण्यासाठी रोबोटचा वापर केला जातोय. तीन रोबोट भाडेपट्टीवर चोक झालेल्या गटारीचे चेंबर साफ करताहेत. तुंबलेल्या गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी महापालिकेने मानवी श्रम टाळले आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक सेक्शन, जेटिंग मिशन आहे. तर ५ मशीन ही कॉन्ट्रॅट बेसिकवर महापालिका ऑपरेट करीत आहे.

- शहरातील मुख्य रस्त्याची जबाबदारी स्मार्ट स्वच्छता टीमवर

महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी स्मार्ट स्वच्छता टीम तयार केली आहे. १४० युवा सफाई कर्मचारी यात कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांकडून शहरातील रस्ते स्वच्छ केले जाते.

डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, नागपूर महापालिका

Web Title: Over 8 thousand employees are responsible for the cleanliness of Nagpur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.