दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगाने एक अब्जाहून अधिक लोक प्रभावित: डॉ. चंद्रशेखर मेश्राम
By सुमेध वाघमार | Published: January 30, 2024 06:26 PM2024-01-30T18:26:19+5:302024-01-30T18:26:37+5:30
रोगाची माहिती असणेही गरजेचे असल्याचे व्यक्त केले मत
सुमेध वाघमारे, नागपूर: दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग (एनटीडी) म्हणजे, ‘सिस्टीसरकोसिस’. यात डेंग्यू, चिकुनगुनिया, चागास डीसीस, ड्रॅकनकुलियासिस ( गिनी वर्म रोग), इकिनोकोकोसिस, मानवी आफ्रिकन ट्रीपॅनोसोमियासिस (झोपेचा आजार) लेशमॅनियासिस, कुष्ठरोग, हत्तीरोग, ऑन्कोसेरसियासिस (रिव्हर ब्लाइंडनेस) रेबीस, खरूज, सिस्टोसोमियासीस आदी रोगांचा समावेश होतो. या रोगाने जागतिक स्तरावर एक अब्जाहून अधिक लोक प्रभावित होतात. यामुळे याची जनजागृती होणे गरजेचे असल्याच, ट्रॉपिकल न्यूरोलॉजी स्पेशॅलिटी ग्रुपचे अध्यक्ष आणि वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले आहे.
जागतिक उपेक्षित उष्णकटिबंधीय रोग दिवस हा दरवर्षी ३० जानेवारीला जगभरात पाळला जातो. त्या निमित्ताने त्यांनी ही माहिती दिली. डॉ. मेश्राम म्हणाले, ‘एनटीडी’ हे जगातील सर्वात गरीब प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. जेथे पाण्याची सुरक्षा, स्वच्छता आणि आरोग्य सेवा निकृष्ट दर्जाची असते.
‘एनटीडी’ मुक्त जग करा
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक, डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस, म्हणाले ‘एनटीडी’ मुक्त जग साध्य करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. ‘एनटीडी’मधील बरेच रोग टाळता येण्याजोगे आहेत, त्यासाठी जनजागृती गरजेची आहे.
न्यूरोसिस्टीसरकोसिस दरवर्षी ५० लाख लोकांना
डॉ. गेब्रेयसस म्हणाले, न्यूसिस्टीसरकोसिस हा आजार टेनिया सोलियम किंवा फीत जंतांच्या अळ्या पासून होतो. मेंदूमध्ये सिस्टीसरकोसिस च्या अळ्या जाणे हे मिरगी येण्याचे
महत्वाचे कारण असते. दरवर्षी जगात ५० लाख लोकांना याचा संसर्ग होतो, आणि ५० हजार लोकांचा मृत्यू होतो. जिथे डुकरांची संख्या जास्त असते तिथे या आजाराचे प्रमाण अधिक असते.
डुकरांच्या मांसाला नाही म्हणा
इंडियन अकादमी आॅफ न्यूरोलॉजीचे माजी अध्यक्ष डॉ. गगनदीप सिंग यांनी सांगितले, भारतात न्यूरोसिस्टीरकोसिसशी संबंधित सक्रिय एपिलेप्सी प्रकरणांची संख्या १० लाखांहून अधिक आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओरिसामध्ये याचे प्रमाण अधिक आहे. पंजाबमध्ये डुकराचे मांस खाल्ले जात असल्याने सिस्टिरकोसिसशचे अधिक रुग्ण आढळून येतात. यामुळे डुकरांचा मांसाला नाही म्हणा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.