वृक्षारोपणाच्या माध्यमातून अतिक्रमणावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:10 AM2021-02-26T04:10:14+5:302021-02-26T04:10:14+5:30
- एनएचएआयची एनएच-६९वर मोहीम : अतिक्रमण तोडताच करण्यात येताहेत वृक्षारोपण वसीम कुरैशी नागपूर : महामार्गावर अनेक ठिकाणी अतिक्रमण हटविल्यानंतर ...
- एनएचएआयची एनएच-६९वर मोहीम : अतिक्रमण तोडताच करण्यात येताहेत वृक्षारोपण
वसीम कुरैशी
नागपूर : महामार्गावर अनेक ठिकाणी अतिक्रमण हटविल्यानंतर दुसऱ्यांदा अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६९च्या काही भागात करण्यात आलेले वृक्षारोपण अतिक्रमण नियंत्रणाचे माध्यम बनले आहे. अतिक्रमण थोपविण्यासाठी निर्धारित सीमेंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम सुरू केली आहे.
वृक्ष पर्यावरणाची स्वच्छता, हिरवळ आणि ऑक्सिजन देण्यासह महामार्गाच्या सौंदयीकरणात महत्त्वाची भूमिका पार पाडते. पण राष्ट्रीय महामार्ग-६९ अतिक्रमण नियंत्रण आणण्यासाठी मदतनिस ठरत आहे. आता रस्त्याच्या कडेला कोणतेही अतिक्रमण तोडल्यानंतर वृक्षारोपण करण्यात येत आहे. याशिवाय महामार्गालगतच्या ले-आउटमालकांनी अवैधरीत्या ले-आउट ते महामार्गापर्यंत जोडलेल्या अॅप्रोच रोडच्या मध्यभागी खड्डे खोदून वृक्ष लावण्यात येत आहेत. त्यामुळे अतिक्रमणावर नियंत्रण आले आहे.
एकल रस्त्याला बनवित आहे दुहेरी
राष्ट्रीय महामार्ग-६९वर कोराडी मंदिरासमोरील उड्डाणपुलाच्या कामाची गती संथ आहे. त्यामुळे महादुलाच्या दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोडचा उपयोग अॅप अॅण्ड डाऊन वाहतुकीसाठी करण्यात येत आहे. पण स्थानिक लोक एकल सर्व्हिस रोडचा उपयोग दुहेरी रोडसारखा करीत आहेत. या भागातून ट्रक, बस आणि अवजड वाहने धावतात. तसेच विरुद्ध दिशेने कार आणि दुचाकी वाहनेसुद्धा येतात. उड्डाणपुलाचे डिझाइन निश्चित झाल्यानंतर प्रारंभीपासूनच बांधकाम उशिराने सुरू आहे. उड्डाणपुलात कोराडी मंदिरजवळील भागात होणाऱ्या मोठ्या अंडरपास रस्त्यावरून अवजड वाहनेसुद्धा जातील. या अंडरपासच्या दोन्ही बाजूला आणखी दोन अंडरपास राहणार आहे. त्यातून कार व दुचाकी जातील. या पुलाचे बांधकाम जवळपास ६ ते ८ महिने उशिराने सुरू आहे. रस्त्यांवर वाहनांचे पार्किंग असल्याने महादुला येथे वाहतुकीला अडचणी येत आहे. या उड्डाणपुलाचे काम जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे.
झाडांचे प्रत्यारोपण यशस्वी नाही
नागपूरच्या जलवायूच्या हिशेबाने येथे मोठ्या झाडांचे प्रत्यारोपण यशस्वीरीत्या होत नाही. मनपाच्या नियमानुसार झाडाचा बुंदा ३० सेमी जाड असेल आणि त्याची मुळे जमिनीत जिवंत राहत असेल तर असे वृक्ष कापणे गैरकायदेशीर असते.
कौस्तुभ चटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ.