ओव्हरलोड ट्रॅव्हल्स जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:09 AM2020-12-06T04:09:31+5:302020-12-06T04:09:31+5:30
शुक्रवारी रात्री ७ च्या सुमारास कॉटन मार्केट परिमंडळात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जाधव त्यांच्या सहकाऱ्यांसह कर्तव्यावर असताना त्यांना ...
शुक्रवारी रात्री ७ च्या सुमारास कॉटन मार्केट परिमंडळात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जाधव त्यांच्या सहकाऱ्यांसह कर्तव्यावर असताना त्यांना जाधव चौकात गुडविल ट्रॅव्हल्समध्ये खचाखच प्रवासी दिसून आले. एएसआय घनश्याम तिडके आणि सहकाऱ्यांनी याबाबत वाहनचालक पिंटू खान माजिद खान (वय ४१, रा. पहाडी वस्ती मध्य प्रदेश) याला विचारणा केली. तो असंबंद्ध उत्तरे देत होता. कागदपत्रे तपासली असता आरोपी प्रवाशांकडून जास्तीचे भाडे आकारून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करीत असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी ती बस जप्त केली.
---
कारवाईचा इशारा
अनेक खासगी बसचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करतात. कारवाईसाठी आलेल्या पोलिसांसोबत वाद घालतात. असे होऊ नये म्हणून प्रवासी बसचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिला आहे.
---