दक्षिण-पूर्व नागपुरात रात्रभर बत्ती गुल ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:19 AM2021-09-02T04:19:34+5:302021-09-02T04:19:34+5:30
नागपूर : सोमवारी रात्री दक्षिण-पूर्व नागपुरातील नागरिकांना विजेविना रात्र काढावी लागली. तांत्रिक कारणामुळे झालेला ब्रेकडाऊन दुरुस्त करण्यात महावितरणच्या विलंबामुळे ...
नागपूर : सोमवारी रात्री दक्षिण-पूर्व नागपुरातील नागरिकांना विजेविना रात्र काढावी लागली. तांत्रिक कारणामुळे झालेला ब्रेकडाऊन दुरुस्त करण्यात महावितरणच्या विलंबामुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागला. मात्र महावितरणने पावसाला दोष देऊन हात वर केले.
नंदनवन सब डिव्हिजन अंतर्गत तिरंगा चौक आणि गणेश नगर परिसरात मंगळवारी सायंकाळी ५.२० वाजता ब्रेकडाऊन दुरुस्त झाला. काही भागात सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला. आम्ही रात्रीच दुरुस्तीचे काम हाती घेतले; मात्र अंधार आणि पावसामुळे शक्य झाले नाही, असे महावितरणचे अधिकारी सांगत आहेत. सकाळी तिरंगा चौकातील भूमिगत केबलमध्ये दोष आढळला. हा सिमेंट रोड असल्याने खोदकामात बराच वेळ गेला. बॅकफीडची सुविधा नसल्याने दुसरीकडून सप्लाय घेता आला नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे.
...
रात्री दुरुस्तीला अडथळा
पलोटी नगरातील काही भागात सोमवारी रात्रीपासूनच वीज गायब होती. रात्री २ वाजता त्रस्त नागरिकांनी महावितरण कार्यालयात संपर्क केला असता ट्रान्स्फाॅर्मरमध्ये दोष आल्याचे सांगण्यात आले.
...
तक्रार एकीकडे, नोंदणी दुसरीकडे
महावितरणने तक्रारी स्वीकारण्यासाठी टोल फ्री क्रमांक दिले आहेत; मात्र अनुभव वेगळाच आहे. आशीर्वाद नगरात वीजपुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकांनी संपर्क साधला असता, तक्रार दुसरीकडेच नोंदविली गेल्याचे लक्षात आले. हा भाग सूतगिरणी उपविभागात येतो, मात्र तक्रार नंदनवन उपविभागात नोंदली गेली.
...