प्रहारींनी सादर केले युद्धजन्य स्थितीचे अवलोकन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:57 PM2019-07-26T23:57:40+5:302019-07-26T23:58:43+5:30

‘कारगिल विजय दिवसा’च्या पूर्वसंध्येला प्रहार मिलिटरी स्कूलच्यावतीने युद्धभूमीमध्ये बलिदान दिलेल्या सैनिकांच्या प्रति समर्पित भाव व्यक्त करत, युद्धजन्य स्थितीचे अवलोकन करणारे सादरीकरण करण्यात आले.

An overview of the warlike situation presented by Prahar | प्रहारींनी सादर केले युद्धजन्य स्थितीचे अवलोकन 

प्रहारींनी सादर केले युद्धजन्य स्थितीचे अवलोकन 

Next
ठळक मुद्देकारगिल विजय दिनाच्या पूर्वसंध्येला आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कारगिल विजय दिवसा’च्या पूर्वसंध्येला प्रहार मिलिटरी स्कूलच्यावतीने युद्धभूमीमध्ये बलिदान दिलेल्या सैनिकांच्या प्रति समर्पित भाव व्यक्त करत, युद्धजन्य स्थितीचे अवलोकन करणारे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी, प्रमुख पाहुणे म्हणून कारगिल युद्ध लढलेले योद्धा लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर उपस्थित होते. त्यांनी १८ हजार फूट उंचीवर शून्य डिग्रीपेक्षाही कमी तापमानात अडीच-तीन महिने सलग कर्तव्य निभावणाऱ्या अनुभवाचे कथन केले. सोबतच, युद्धात धारातीर्थी पडणाऱ्या जवानांची वीरगाथा ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले. प्रहार मिलिटरी स्कूलच्या रविनगर येथील अण्णासाहेब गोखले सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या बॅण्ड पथकाने पाहुण्यांचे स्वागत केले. भारतमातेच्या पुजनाने आणि अमर जवान स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करत, कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी, प्रहारचे संस्थापक स्व. कर्नल सुनील देशपांडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी कारगिल युद्धात वीरगतीला प्राप्त झालेले वीर कॅप्टन किशिंग नानगृन, कॅप्टन विजयंत थापर, कॅप्टन हनिफुद्दीन, रायफल मॅन संजय कुमार यांनी दाखवलेल्या युद्धकौशल्याचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत प्लाईट लेफ्टनंट शिवानी देशपांडे यांनी करवून दिले. संचालन तपस्सू मेश्राम यांनी केले. आभार मुख्याध्यापिका शुभा मोहगांवकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनसाठी शर्मिष्ठा नाग, शितल बागेश्वर, सतीश मोरे यांनी परिश्रम घेतले. यावेळी, प्रहार समाज जागृती संस्थेच्या अध्यक्षा शमा देशपांडे, सीपी अ‍ॅण्ड बेरार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मेजर जनरल देव, सचिव अनिल महाजन, मेजर जनरल अनिल बाम, रेखा पांडे उपस्थित होते.

Web Title: An overview of the warlike situation presented by Prahar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.