एका किडनीच्या भरवशावर कोरोनाला दिली मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:07 AM2021-05-01T04:07:58+5:302021-05-01T04:07:58+5:30

- सिटी स्कोर १२ आणि ५० टक्के लंग इन्फेक्शन असतानाही महिला रुग्णाने दाखवला संयम - सकारात्मक विचारांनी संक्रमणमुक्त होण्यास ...

Overwhelmed corona with a kidney | एका किडनीच्या भरवशावर कोरोनाला दिली मात

एका किडनीच्या भरवशावर कोरोनाला दिली मात

Next

- सिटी स्कोर १२ आणि ५० टक्के लंग इन्फेक्शन असतानाही महिला रुग्णाने दाखवला संयम

- सकारात्मक विचारांनी संक्रमणमुक्त होण्यास मिळाली मदत

- लोकमत पॉझिटिव्ह स्टोरी

योगेंद्र शंभरकर / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात दररोज कोरोना संक्रमणामुळे युवकांसह धडधाकट व्यक्तींचा मृत्यू होत आहे. मात्र, अशा स्थितीतही सकारात्मक विचारांनी कोरोना संक्रमणाला मात दिली जाऊ शकते, असेच एक उदाहरण ५६ वर्षीय महिला मेघा अरविंद भांदककर यांनी सादर केले आहे. दोन वर्षांपूर्वी गंभीर आजारामुळे त्यांचे एक मूत्रपिंड (किडनी) निकामी झाले होते. ऑपरेशननंतर त्यांना एकच मूत्रपिंड आहे. अशा स्थितीत २७ मार्च रोजी त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोना चाचणी केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. परंतु, हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाला नसल्याने काही दिवस घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांचा सिटी स्कोर १२पर्यंत पोहोचला आणि फुप्फुसांमध्ये ५० टक्के इन्फेक्शन पसरले होते. मुलगा नितीशच्या परिश्रमानंतर त्यांना १ एप्रिल रोजी छत्रपती चौक येथील एका खासगी इस्पितळात बेड मिळाले. मात्र, त्यांच्या प्रकृतीचा पूर्वइतिहास बघता आणि वर्तमान प्रकृती बघता उपचारात भारी डोस देण्यास डॉक्टर कचरत होते. परंतु, मेघा भांदककर यांनी धीर सोडला नाही. पूर्णत: सुदृढ होऊन घरी परतायचे आहे, असा ठाम निश्चय केला. औषधांच्या नियमित मात्रा व व्यवस्थित आहाराने त्यांच्या आरोग्यात आठवडाभरातच आश्चर्यजनक सुधारणा झाली. पूर्णत: संक्रमणमुक्त झाल्यावर त्यांनी इस्पितळातील डॉक्टर व आरोग्यसेवकांसह फोटो काढून त्या घरी परतल्या.

-------------------

आई घाबरली नाही

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावरही आई घाबरली नाही. उलट आई मलाच सकारात्मक विचार ठेवण्यास प्रवृत्त करत होती. एका किडनीच्या भरवशावर हिमतीने ती सुदृढ होऊन घरी परतली आहे. ती आजही इतर सामान्य महिलांप्रमाणे घरातील कामे करत असल्याचे नितीश भांदककर यांनी सांगितले.

-------------

सकारात्मकतेने झाले कोरोनामुक्त

किडनीच्या गंभीर आजारातही मी घाबरली नाही. एकच किडनी असताना कोरोना संक्रमण झाल्याने कुटुंबातील सर्व सदस्य घाबरले होते. मात्र, मी बरी होईल, असा आत्मविश्वास होता, असे मेघा भांदककर म्हणाल्या.

-----------

८२ वर्षीय पुष्पाताईसुद्धा बऱ्या झाल्या

हॉस्पिटलमध्ये आईसोबतच एक अन्य ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक पुष्पाताईसुद्धा उपचारासाठी भरती झाल्या होत्या. या काळात आई आणि पुष्पाताई एकमेकांमध्ये मिसळून गेल्या होत्या. दोघांनीही लवकरच उत्तम आरोग्यासह घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. दोघेही ठीक झाल्यावर डॉक्टरांनी दोघांसोबत फोटो काढल्याचे नितीश यांनी सांगितले.

.................

Web Title: Overwhelmed corona with a kidney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.