नागपुरातील मंदिरात चोऱ्या करून सजविले स्वत:चे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:05 AM2019-04-09T11:05:44+5:302019-04-09T11:06:52+5:30

नागपूर, वर्ध्यासह ठिकठिकाणच्या मंदिरात चोऱ्या करून दानपेटीतील रक्कम तसेच मौल्यवान चीजवस्तू लंपास करणारा कुख्यात चोरटा दीपक बनसोड याला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केली.

Own house decorated with robbery in Nagpur temple | नागपुरातील मंदिरात चोऱ्या करून सजविले स्वत:चे घर

नागपुरातील मंदिरात चोऱ्या करून सजविले स्वत:चे घर

Next
ठळक मुद्देअट्टल चोर गजाआड २१ गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर, वर्ध्यासह ठिकठिकाणच्या मंदिरात चोऱ्या करून दानपेटीतील रक्कम तसेच मौल्यवान चीजवस्तू लंपास करणारा कुख्यात चोरटा दीपक बनसोड याला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केली. त्याच्याकडून ठिकठिकाणच्या २१ चोरी-घरफोडीचा पोलिसांनी छडा लावला असून, १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष हे की, चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने, तांब्याच्या मूर्ती, टीव्ही घरात सजवून ठेवत होता.
गेल्या काही दिवसांपासून शहरात मंदिरातील दानपेट्या फोडण्याचे, चोरण्याचे गुन्हे वाढले होते. त्यामुळे गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी मंदिरात चोरी करणाºया सराईत गुन्हेगारांवर नजर रोखली होती. ५ एप्रिलच्या पहाटे नबाबपुरा परिसरातील पातुरकर राममंदिराजवळ कुख्यात बनसोड संशयास्पद अवस्थेत गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलिसांना दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो असंबद्ध उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्याच्याजवळची बॅग तपासली असता त्यात चोरी-घरफोडी करण्यासाठी वापरली जाणारी लोखंडी कटौनी, पेचकस, पेंचीस, टॉर्च तसेच चेहरा लपविण्यासाठी वापरला जाणारा मास्क आढळला. तो ज्या मोटरसायकलवर होता ती मोटरसायकलदेखील त्याने कारंजा येथून चोरून आणल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याचा पीसीआर मिळविला. चौकशीत त्याने २९ आणि ३० जानेवारीच्या रात्रीदरम्यान बुधवारी बाजार महालमधील वानरराज हनुमान मंदिरात आरोपी बनसोडने दानपेटीचे कुलूप तोडून नाणी आणि रोख असे एकूण ३५ हजार रुपये चोरून नेले होते. ३० जानेवारीला सकाळी ही बाब उघड झाल्यानंतर पुजारी योगेंद्र चंद्रशेखर भोम्बे (रा. महाल) यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. एवढेच नव्हे तर, पीसीआरदरम्यान कुख्यात बनसोडने शहरातील जरीपटका परिसरात ४, धंतोली ३, वाडी २, कोराडी २, नंदनवन २ तसेच गणेशपेठ, इमामवाडा, सक्करदरा, कळमना आणि शांतिनगर परिसरात प्रत्येकी १ तर नागपूर ग्रामीणमधील कळमेश्वरमध्ये १ आणि वर्धा येथील रामनगरातील मंदिरात चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ४७ हजार २४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अडचणीत नोटा, चिल्लर करायचा खर्च
आरोपी बनसोड हा चोरी-घरफोडीत मिळालेल्या नोटांचा वापर आधी करायचा. नाणी (चिल्लर) खूपच गरज भासली तर खर्च करायचा. त्याच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या आदेशानुसार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बजावली.

Web Title: Own house decorated with robbery in Nagpur temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.