शहरात ३० ठिकाणी ऑक्सिजन सेंटर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:14+5:302021-06-29T04:07:14+5:30

पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतला आढावा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची तिसरी लाट थांबविण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. ...

Oxygen centers at 30 places in the city () | शहरात ३० ठिकाणी ऑक्सिजन सेंटर ()

शहरात ३० ठिकाणी ऑक्सिजन सेंटर ()

Next

पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची तिसरी लाट थांबविण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. नागरिकांना सुलभपणे ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी ३० ऑक्सिजन वॉक एन सेंटर सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री राऊत यांनी कोरोनासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उद्योग सह. संचालक धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

ऑक्सिजन सेंटरवर ज्या नागरिकांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यांना तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यात येईल व त्यानंतर जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती होण्यासाठी मदत करण्यात येईल. यासाठी १०० कॉन्सन्ट्रेटर सज्ज ठेवण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार आणखी १०० कॉन्सन्ट्रेटर जिल्हा निधीमधून खरेदी करण्यात येतील,असेही त्यांनी सांगितले. कोविडवर मात करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक असून तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजन, बेडची व्यवस्था, ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व रुग्णालयातील यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.

बॉक्स

डेल्टा व्हेरियंट : संशयितांचा रिपोर्टसाठी नियोजन

जिल्ह्यात नवीन प्रकारचे कोविड रुग्ण आढळले असून यामध्ये उमरेड येथे आठ तर नागपूर येथे चार रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांच्या कोविड तपासणीचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे पाठवून तत्काळ रिपोर्ट मिळेल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री राऊत यांनी दिल्या.

अशी आहे सज्जता

-ऑक्सिजन निर्मिती सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत.

- द्रवरुप ऑक्सिजन साठविण्यासाठी मध्यवर्ती केंद्र उभारण्यात येणार आहे.

- १,३७५ नवीन ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करण्यात येईल

-रोज १६० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असून यापेक्षा तीनपट जास्त ऑक्सिजन उपलब्ध होईल.

- अमरावती रोड येथे ६०० बेड्स नव्याने उपलब्ध होणार असून शहरात एकूण १,८०० बेड्स उपलब्ध होतील.

- २०० खाटा बालकांसाठी राखीव

लसीकरणाचा वेग वाढणार, दररोज ५० हजार लसीकरणाचे उद्दीष्ट

- लसीकरण केंद्र वाढवणार

- किमान २५ खासगी रुग्णालयात लसीकरणाचे केंद्र

Web Title: Oxygen centers at 30 places in the city ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.