ऑक्सिजन काॅन्सेट्रेटर मशीन रुग्णांच्या सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:08 AM2021-05-15T04:08:31+5:302021-05-15T04:08:31+5:30

कळमेश्वर : ग्रामीण भागातील काेराेना रुग्णांची हाेणारी परवड व त्यांना भासणारी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेता युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रशांत ...

Oxygen concentrator machine at patient service | ऑक्सिजन काॅन्सेट्रेटर मशीन रुग्णांच्या सेवेत

ऑक्सिजन काॅन्सेट्रेटर मशीन रुग्णांच्या सेवेत

googlenewsNext

कळमेश्वर : ग्रामीण भागातील काेराेना रुग्णांची हाेणारी परवड व त्यांना भासणारी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेता युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रशांत इखार यांनी दाेन ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन खरेदी केल्या असून, त्या गरजू रुग्णांना दिल्या जात आहेत.

कळमेश्वर शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावत असल्याने त्यांना ऑक्सिजनची नितांत गरज भासते. अशावेळी त्यांना रुग्णालयात भरती करणे व ऑक्सिजन लावणे गरजेचे असते. या भागातील रुग्णांना उपचारासाठी नागपूर शहरात न्यावे लागत असून, तिथेही शासकीय रुग्णालयात बेडची कमतरता जाणवत असल्याने तसेच खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर असल्याने गरीब रुग्णांची माेठी गैरसाेय हाेत आहे. त्यांची ही गैरसाेय त्यांच्यासाठी जीवघेणी ठरत असल्याने आपण दाेन ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन खरेदी केल्या असून, त्या गरजू रुग्णांना माेफत वापरायला देत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत इखार यांनी आपल्याला औषधे व धान्य माेफत दिल्याची माहिती काही रुग्णांनी दिली. प्रत्येक बाबतीत सरकारवर अवलंबून राहणे याेग्य नाही. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आपण हा उपक्रम राबवित असल्याचे प्रशांत इखार यांनी स्पष्ट केले.

===Photopath===

130521\5921img-20210513-wa0115.jpg

===Caption===

कळमेश्वर - ऑक्सिजन मशीन

Web Title: Oxygen concentrator machine at patient service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.