ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टँक नागपुरात दाखल : १२५ मेट्रिक टन साठवणूक क्षमता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 09:54 PM2021-07-20T21:54:48+5:302021-07-20T21:57:52+5:30

Oxygen storage jumbo tank ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी १२५ मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेला लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टॅंक मंगळवारी नागपुरात दाखल झाला आहे. हा स्टोरेज टँक मनोरुग्णालयाच्या परिसरात बसविण्यात येणार आहे.

Oxygen storage jumbo tank arrives in Nagpur: 125 MT storage capacity | ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टँक नागपुरात दाखल : १२५ मेट्रिक टन साठवणूक क्षमता 

ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टँक नागपुरात दाखल : १२५ मेट्रिक टन साठवणूक क्षमता 

googlenewsNext
ठळक मुद्देतिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी १२५ मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेला लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टॅंक मंगळवारी नागपुरात दाखल झाला आहे. हा स्टोरेज टँक मनोरुग्णालयाच्या परिसरात बसविण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन लहान मुलांसाठीच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत. जिल्ह्याला ४८० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेऊन उपलब्धताबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत तामिळनाडू येथून १२५ मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेला ऑक्सिजन जम्बो टँक मंगळवारी शहरात दाखल झाला. या प्रकल्पासाठी १ कोटी ९६ लाख रुपये खर्च येणार आहे. पुढील १५ दिवसांत या टँक लागणार असून, त्यानंतर ऑक्सिजन साठवणुकीची व्यवस्था पूर्ण होणार आहे.

Web Title: Oxygen storage jumbo tank arrives in Nagpur: 125 MT storage capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.