पी. चिदम्बरम यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 10:49 PM2019-08-26T22:49:17+5:302019-08-26T22:50:41+5:30
माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई करण्यात आली आहे,असा आरोप डेमोक्रॅटिक अॅडव्होकेट असोसिएशन फॉर कॉन्स्टिट्युशनल अॅक्शन (डाका) ने केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई करण्यात आली आहे. त्यांना भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटक करताना मानवाधिकाराचे उल्लंघन झाले आहे असा आरोप डेमोक्रॅटिक अॅडव्होकेट असोसिएशन फॉर कॉन्स्टिट्युशनल अॅक्शन (डाका)चे संयोजक अॅड. शशिभूषण वाहाणे व अॅड. शैलेश नारनवरे यांनी सोमवारी केला.
यासंदर्भात संघटनेने रविभवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. चिदम्बरम आॅक्सफोर्ड विद्यापीठाचे विद्यार्थी असून ते कायदेतज्ज्ञ आहेत. असे असताना त्यांना अप्रतिष्ठा होईल अशा पद्धतीने अटक करण्यात आली. त्यांच्यावरील कारवाई राज्यघटनेतील २१ व्या अनुच्छेदामधील तरतुदीची पायमल्ली करणारी आहे. याशिवाय या कारवाईने अनेक कायदेशीर सिद्धांतांचे उल्लंघन केले आहे. ही कारवाई निषेधार्ह आहे. देशात राज्यघटनेचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. याप्रसंगी जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अॅड. कमल सतुजा, डाकाचे अध्यक्ष अॅड. संजय पाटील, अॅड. रसपालसिंग रेणू आदी उपस्थित होते.