लसीकरणाची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:08 AM2021-04-27T04:08:20+5:302021-04-27T04:08:20+5:30

सोमवारी ८,८२१ लाभार्थ्यांना डोस : १५ ऑगस्टपर्यंत १८ वर्षावरील सर्वांना कशी मिळणार लस? नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या ३० ...

The pace of vaccination slowed | लसीकरणाची गती मंदावली

लसीकरणाची गती मंदावली

Next

सोमवारी ८,८२१ लाभार्थ्यांना डोस : १५ ऑगस्टपर्यंत १८ वर्षावरील सर्वांना कशी मिळणार लस?

नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस दिली जाणार आहे. अशा लोकांची संख्या १९ लाखांहून अधिक आहे. यात ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या सुमारे आठ लाखांच्या आसपास आहे. यातील जवळपास ४ लाख ९० हजार लोकांना लसीचा पहिला डोस दिला आहे, तर दुसरा डोस ६९ हजार ८२ लोकांनी घेतला आहे. १५ ऑगस्टपर्यंत १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. याचा विचार करता लसीकरणाला गती मिळणे अपेक्षित असताना मागील ११ एप्रिलपासून शहरातील लसीकरणाची गती मंदावली आहे.

नागपूर शहरात मध्यंतरी लसीकरणाचा आकडा १५ ते १६ हजारांवर पोहोचाला होता; पण मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने मागील काही दिवसांपासून शहरातील लसीकरण मोहीम संथ पडली आहे. सोमवारी ८८२१ लाभार्थींना लस देण्यात आली. यात पहिला डोस ३६५४ जणांना, तर दुसरा डोस ५१६७ लाभार्थींना देण्यात आला. पुरेसा साठा नसल्याने काही केंद्रांवरून नागरिक परत जात आहेत. कोव्हॅक्सिनचे सोमवारी फक्त ५४१ डोस देण्यात आले. दुसरा डोस असणाऱ्यांनाच ही लस दिली जात आहे.

सर्वांत आधी आरोग्य सेवकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. ४२,४८९ आरोग्य सेवकांनी पहिला डोस तर १८७१३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ४३१३१ फ्रंटलाइन वर्कर्सना पहिला डोस तर १११६८ जणांनी दुसरा डोस घेतला. ४५ ते ६० वर्षांपर्यंतच्या ९२३६९ नागरिकांनी लस घेतली, तर ५९७९ जणांनी दुसरा डोस घेतला. ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ७३०८८ नागरिकांनी पहिला तर ६६१२ जणांनी दुसरा डोस घेतला. ६० वर्षांवरील १,५५,७३९ ज्येष्ठांनी लसीचा पहिला तर २७,३५० जणांनी दुसरा डोस घेतला. मागील काही दिवसांत लसीकरणाची गती संथ झाली आहे. ती वाढविण्याची गरज आहे.

....

केंद्रांची संख्या वाढवावी लागेल

शहरातील १२२ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रांची क्षमता दररोज २० हजारांहून अधिक आहे; परंतु लसीचा पुरेसा साठा नसल्याने मागील काही दिवसांत लसीकरण कमी होत आहे. काही दिवसांपूर्वी १६ हजारांवर गेलेला लसीकरणाचा आकडा मागील दोन आठवड्यांत सात ते आठ हजारांवर आला आहे. आहे. त्यानुसार दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच लस साठा उपलब्ध आहे. १५ ऑगस्टपर्यंत १८ वर्षावरील सर्वांना लस द्यावयाची झाल्यास दररोज २७ ते २८ हजार जणांना लस द्यावी लागेल.

...

शहरातील लसीकरण (२५ एप्रिलपर्यंत)

पहिला डोस

आरोग्य सेवक- ४२४८९

फ्रंट लाइन वर्कर- ४३१३१

४५ वर्षांवरील- ९२३६९

४५ वर्षांवरील सहव्याधी- ७३०८८

६० वर्षांवरील- १५५७३९

एकूण- ४०६८१६

...

दुसरा डोस

पहिला डोस

आरोग्य सेवक- १८७१३

फ्रंट लाइन वर्कर- १११६८

४५ वर्षांवरील- ५९७९

४५ वर्षांवरील सहव्याधी- ६६१२

६० वर्षांवरील- ६९८२२

सर्व लसीकरण एकूण- ४७६६३८

Web Title: The pace of vaccination slowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.