नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी पचेरीवाला (३)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:08 AM2020-12-29T04:08:23+5:302020-12-29T04:08:23+5:30
नागपूर : नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या ८३ व्या आमसभेत अध्यक्षपदी विष्णूकुमार पचेरीवाला यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर ...
नागपूर : नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या ८३ व्या आमसभेत अध्यक्षपदी विष्णूकुमार पचेरीवाला यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सचिवपदी तरुण निर्बाण यांची निवड झाली.
गुलाबचंद पचेरीवाला आणि अॅड. आलोक डागा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप जाजू, उपाध्यक्ष गोविंद पसारी, सहसचिव विवेक मुरारका व मितेष कटारिया आणि संचालक मंडळात विजय जयस्वाल, विपीन पनपालिया, शंकरलाल खंडेलवाल, नाथाभाई पटेल, वसंत पालीवाल, देवकीनंदन खंडेलवाल, नितीन बन्सल, संजय पांडे, गजानन वाघमारे, सुशील अग्रवाल, कमल कलंत्री, गिरीश लिलडिया, वासुदेव झामनानी, अजय पांडे, योगेश पालीवाल, रवींद्र चांडक, संदीप साबू व राजेश सोनी यांचा समावेश आहे.
विष्णूकुमार पचेरीवाला म्हणाले, व्यापारी हे केवळ व्यापारी नसून ग्राहक आणि नागरिक आहेत. व्यापाऱ्यांनी चांगल्या नागरिकाचा परिचय देताना करचोरी, भेसळ आणि अन्य अनैतिक कामापासून दूर राहावे. नागपुरातील प्रत्येक व्यापारी आणि व्यावसायिक संस्थांनी चेंबरशी जुळावे. तरुण निर्बाण यांनी गेल्या वर्षीचा अहवाल सादर केला. चेंबरचे माजी अध्यक्ष सीए कैलास जोगानी म्हणाले, कोरोनापासून बचावासाठी व्यापाऱ्यांनी मास्क लावावा आणि सॅनिटायझरचा उपयोग करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
याप्रसंगी चेंबरचे माजी अध्यक्ष संतोषकुमार अग्रवाल, महेंद्र कटारिया, भगीरथ मुरारका यांच्यासह विजयकुमार धाडीवाल, रामअवतार अग्रवाल, विविध व्यापारी संघटनांचे अध्यक्ष व सचिव आणि चेंबरचे सदस्य व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे संचालन विवेक मुरारका व आभार तरुण निर्बाण यांनी मानले.