पाचपावली, सदर कोविड केअर सेंटर सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:07 AM2021-03-20T04:07:42+5:302021-03-20T04:07:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात अनेक रुग्ण असे आहेत, ज्यांना वैद्यकीय ...

Pachpavli, Sadar Kovid Care Center will be started | पाचपावली, सदर कोविड केअर सेंटर सुरू होणार

पाचपावली, सदर कोविड केअर सेंटर सुरू होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात अनेक रुग्ण असे आहेत, ज्यांना वैद्यकीय सेवेची गरज आहे. ही बाब लक्षात घेता सदर येथील आयुष दवाखाना व पाचपावली येथील कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू करण्यात यावे, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. महापाैरांच्या या निर्देशानुसार दोन दिवसात हे सेंटर सुरू केले जातील, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. यासंदर्भात आवश्यक कारवाईचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

महापौरांनी सांगितले की, मागच्या वेळी कोरोना संसर्ग वाढला असताना आयुष दवाखाना सदर व पाचपावली रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू होते. शहरात सक्रिय रुग्णांची संख्या २१ हजारावर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत कोविड केअर सेंटरची खूप गरज आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे.

Web Title: Pachpavli, Sadar Kovid Care Center will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.