कर्ज काढून पिकवलेला धान जळाला.. वृद्ध शेतकऱ्याच्या हातातोंडाचा घास गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:38 PM2020-12-21T12:38:39+5:302020-12-21T12:39:04+5:30
Gadchiroli News Agriculture एटापल्ली व गुरुपल्ली येथील धानाच्या पुंजण्याला (ढिगाऱ्याला) अज्ञात इसमाकडून आग लावल्याने यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: एटापल्ली व गुरुपल्ली येथील धानाच्या पुंजण्याला (ढिगाऱ्याला) अज्ञात इसमाकडून आग लावल्याने यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आठ दिवसातील ही दुसरी घटना असुन शासनाकडुन आर्थिक नुकसान भरपाईची मागणी केली आहे
एटापल्ली ( टोला ) येथील शेतकरी रामय्या नर्सय्या दंडीकवार ( वय ७५) या वृद्ध शेतकऱ्याने कर्ज काढुन एटापल्ली येथील तलावाच्या मागे असलेल्या आपल्या ५ ते ६ एकर शेतात धान टाकले. दि. २० च्या रात्री एका अज्ञात इसमाने हे धान्याचे पुंजणे जाळून टाकल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. यात वृद्ध शेतकऱ्याचे सपुर्णं धान जळाले. तोंडात आलेला घास गेल्यांने या शेतकऱ्याला मोठा हादरा बसला आहे, आर्थिक नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेची तक्रार करण्यात आली आहे.