‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’साठी तो धावला ३३३ किलोमीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 08:52 PM2019-07-27T20:52:20+5:302019-07-27T20:56:01+5:30

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हा उद्देश घेऊन ‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’ या संदेशाला गावखेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी एक युवक हाती तिरंगा ध्वज घेऊन तब्बल ३३३ किलोमीटर धावला.

For 'Padhenga India, Badhenga India', he ran 333 kilometers | ‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’साठी तो धावला ३३३ किलोमीटर

‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’साठी तो धावला ३३३ किलोमीटर

googlenewsNext
ठळक मुद्देअतुल चौकसेची कामगिरी : ८० वर शाळांना दिली भेट, विद्यार्थ्यांशी साधला संवाद

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हा उद्देश घेऊन ‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’ या संदेशाला गावखेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी एक युवक हाती तिरंगा ध्वज घेऊन तब्बल ३३३ किलोमीटर धावला. 

यादरम्यान त्याने ७० पेक्षा जास्त गावे व ८० वर शाळांना भेटी देत शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
अतुलकुमार चौकसे त्या तरुण धावपटूचे नाव. समाजासाठी आपले काही देणे लागते, या आयुष्यात देशासाठी काही महत्त्वपूर्ण कामगिरी करावी, या विचाराने अतुल झपाटलेला आहे. नुकतेच त्याने दक्षिण आफिक्रेच्या सहारा वाळवंटात, ५० अंशावर तापमानात, सलग सात दिवस २५० किलोमीटरची सर्वात कठीण मॅरेथॉनमध्येभारताचे प्रतिनिधित्व केले. कच्छच्या वाळवंटातही त्याने १६१ किलोमीटर तर १८ हजार फूट उंच असलेल्या हिमालयाचा दऱ्याखोऱ्यात ११४ किलोमीटरचे अंतर त्याने धावत कापले. आपल्या या धावण्याचा समाजोपयोगही व्हावा, या उद्देशाने ‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’ हा संदेश गावखेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. नागपूर ते पचमढी हे ३३३ किलोमीटर अंतराचे लक्ष्य ठेवले. यात त्याचा भाऊ आशिषकुमार चौकसे मदतीसाठी आला. १४ जुलै रोजी नागपूरच्या रामगिरीवरून अतुलने धावण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच्यासोबतच विविध सामाजिक संस्था व क्रीडा संस्थेचे प्रतिनिधी नागपूरच्या सीमारेषपर्यंत धावले. अतुलने सहा दिवसांत ३३३ किलोमीटर अंतर कापले. यादरम्यान तीन जिल्हे, १५ तहसील, ७० पेक्षा जास्त गावे व ८० वर शाळांना भेटी दिल्या. तेथील प्राचार्य, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थ्यांना भेटून एकही मुलगा-मुलगी शिक्षणापासूच वंचित राहणार नाही, अर्धवट शिक्षण सोडून जाणाऱ्यांसाठी उपाययोजना करण्यासंदर्भातही त्याने संवाद साधला. २२ जुलै रोजी अतुल पचमढी येथे पोहचला. यावेळी डेप्युटी कमांडिंग ऑफिसर कर्नल विजय तोमर यांनी त्याचे स्वागत केले. २१ जुलै रोजी पचमढी येथे आयोजित २१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेतही तो सहभागी झाला.
‘लोकमत’शी बोलताना अतुल म्हणाला, कुटुंबातील दारिद्र्य, वस्तीतील गुन्हेगारी प्रवृत्ती, अज्ञान, अत्यंत निकृष्ट व प्रतिकूल वातावरण आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव या सर्वांचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो. परिणामत: या भागात राहणारी मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे आढळून आले. भाविष्यात इंटरनॅशनल चॅलेंजेस्मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली.

Web Title: For 'Padhenga India, Badhenga India', he ran 333 kilometers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.