पद्मभूषण माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 10:49 PM2019-01-03T22:49:31+5:302019-01-03T22:55:17+5:30

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंबाझरी घाट येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची कन्या डॉ. अरुणा पाटील यांनी अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले. 

Padmabhushan Former Justice Chandrashekhar Dharmadhikari Anantat vileen | पद्मभूषण माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी अनंतात विलीन

पद्मभूषण माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी अनंतात विलीन

Next
ठळक मुद्देकन्या अरुणा पाटील यांंच्याहस्ते अंत्यविधी : गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंबाझरी घाट येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची कन्या डॉ. अरुणा पाटील यांनी अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले. 


जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी महाराष्ट्र शासनाच्यावतीने पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पोलीस महासंचालकांच्यावतीने पुष्पचक्र अर्पण केले. सशस्त्र पोलीस दलाच्यावतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे पार्थिव राष्ट्रध्वजामध्ये ठेवण्यात आले होते. पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर राष्ट्रध्वज नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी पुत्र न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी, डॉ. अरुणा पाटील तसेच न्या. डी. एन. धर्माधिकारी, न्या. आर. के. देशपांडे, न्या. विकास शिरपूरकर (निवृत्त), उद्योगपती राहुल बजाज, डॉ. अभय बंग, श्रीमती राणी बंग, अशोक जैन तसेच त्यांचे सर्व नातवंडं व नातेवाईकांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. यावेळी राज्यातून आलेल्या विविध मान्यवरांनी मौन श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कारासाठी गांधी संशोधन प्रतिष्ठान, सेवाग्राम आश्रम समिती, बजाज समूहाच्या विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, बजाज कुटुंबीय, न्यायमूर्ती जे. ए. हक, न्या. अतुल चांदूरकर, न्या. मनीष पिंपळे, न्या. रोहित देव, न्या. व्ही. एम. देशपांडे, न्या. मुरलीधर गिरडकर, न्या. विनय जोशी, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे प्रो. मनोज कुमार, कुलसचिव प्रो. के. के. सिंह. मा. म. गडकरी, गौतम बजाज तसेच सामाजिक, राजकीय विविध मान्यवर उपस्थित होते.
सर्वोदय आश्रमात अंत्यदर्शन
अंत्यसंस्कारापूर्वी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे पार्थिव सकाळी १० वाजतापासून अंत्यदर्शनासाठी बोले पेट्रोल पंपजवळील सर्वोदय आश्रमात ठेवण्यात आले होते. यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी येथे पोहचून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. याशिवाय राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेउन मौन श्रद्धांजली वाहिली. यामध्ये शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, उद्योजक राहुल बजाज, शेखर बजाज, राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नितीन राऊत, गिरीश गांधी, आमदार अनिल सोले, मनपाचे सत्तापक्ष नेता संदीप जोशी, अ‍ॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, अशोक धवड, रा.स्व. संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, महानगर कार्यवाह अरविंद कुकडे, शोभाताई फडणवीस, बाबुराव तिडके, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अखिल भारतीय सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव भाई, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी.एन.आर प्रभू, माजी अध्यक्ष जयवंत बापू मटकर, ज्येष्ठ गांधीवादी लीलाताई चितळे, रुपाताई कुळकर्णी-बोधी, हरिभाऊ केदार, सुरेश पांढरीपांडे, ज्येष्ठ गांधीवादी सुगंध बरंठ, जळगावचे भंवरलाल जैन, सर्वोदय आश्रमाच्या दमयंती पांढरीपांडे, ज्येष्ठ सर्वोदयी दत्तात्रय बर्गी, अशोक बर्गी, पौर्णिमा पाटील, वृषाली देशपांडे, प्रभाकर ढोक, वीणा बजाज, दिवाकर मोहनी, साधना कानिटकर, अधिवक्ता परिषदेचे अ‍ॅड. पारिजात पांडे, नरकेसरी प्रकाशनचे धनंजय बापट, अ.रा. देशपांडे, नितीन चौधरी, राजेश  कुंभलकर, संजय देशपांडे, हेमंत वाघ, आनंदवनचे सुधाकर कडू, माधव विठ्ठल कळीकर, डॉ. विजय टोळ, अ‍ॅड. मेहाडीया, अनिता धर्माधिकारी, एस.क्यू. जामा, जयप्रकाश गुप्ता, कवी राजेंद्र पटोरिया आदींनी अंत्यदर्शन घेत मौन श्रद्धांजली अर्पण केली.

 

Web Title: Padmabhushan Former Justice Chandrashekhar Dharmadhikari Anantat vileen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर