पदमादेवी कोटेचा यांचे ‘२५ वर्षीतप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:09 AM2021-05-14T04:09:48+5:302021-05-14T04:09:48+5:30

नागपूर : ९८ वर्षीय पदमा देवी कोटेचा या अक्षय तृतीयेच्या पर्वावर आपले ‘२५ वर्षीतप’ पूर्ण करीत आहेत. मागील २५ ...

Padmadevi Kotecha's '25 years old ' | पदमादेवी कोटेचा यांचे ‘२५ वर्षीतप’

पदमादेवी कोटेचा यांचे ‘२५ वर्षीतप’

Next

नागपूर : ९८ वर्षीय पदमा देवी कोटेचा या अक्षय तृतीयेच्या पर्वावर आपले ‘२५ वर्षीतप’ पूर्ण करीत आहेत. मागील २५ वर्षापासून त्या हे कठीण तप करीत आहेत.

जैन धर्मात ज्ञान, दर्शन, चरित्र आणि तप हे मोक्षाचे चार मार्ग सांगितले आहेत. भ. महावीर स्वामी यांनी सांगितल्यानुसार, तप करण्यासाठी पंचेंद्रियांवर विजय मिळविणे आवश्यक असते. यात वर्षीतप सर्वात महत्वाचे असते. हे कठीण तप पदमादेवी कोटेचा यांनी सतत २५ वर्षे केले. अक्षय तृतीयेला त्याला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी ६४ व्या वर्षी या तपाला सुरुवात केली. आता त्या ८९ वर्षांच्या आहेत. पुढेही हे तप कायम ठेवण्याचा त्यांचा मनोदय आहे.

या कठीण तपस्याकाळात त्यांनी ३० दिवस फक्त गरम पाणी प्राशन केले. या तपाला मासक्षमण म्हणतात. ते त्यांनी दोन वेळा केले आहे. याच प्रकारे १६ दिवस उपवासासह अनेक तपस्या त्यांनी केल्याची माहिती त्यांचे पुत्र सर्व मानव सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी दिली आहे. भारत वर्षामध्ये वर्षीतप हा रेकॉर्ड असून श्रावक, श्राविकाच एवढी वर्षे करू शकतात.

Web Title: Padmadevi Kotecha's '25 years old '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.