Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांच्या प्रचारासाठी चिंचभुवन, मेरबाबानगरात पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 11:18 PM2019-10-09T23:18:54+5:302019-10-09T23:19:50+5:30

दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्राचे उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी सायंकाळी पदयात्रा काढण्यात आली.

Padyatra in Chinchbhavan, Meharbabanagar to promote the Chief Minister | Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांच्या प्रचारासाठी चिंचभुवन, मेरबाबानगरात पदयात्रा

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांच्या प्रचारासाठी चिंचभुवन, मेरबाबानगरात पदयात्रा

Next
ठळक मुद्देनगरसेवक उतरले मैदानात : नागरिकांशी साधताहेत संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्राचे उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी सायंकाळी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचे नेतृत्व नगरसेवक अविनाश ठाकरे यांनी केले.
या पदयात्रेमध्ये मंडळ अध्यक्ष रमेश भंडारी, नगरसेवक संदीप गवई, नगरसेविका विशाखा मोहोड, नगरसेविका जयश्री वाडीभस्मे, प्रभाग ३५ चे अध्यक्ष भूषण केसकर, महामंत्री युवराज पागोरे, अतुल सोनटक्के, प्रभू तुपे, सांयकाल काका, वैशाली सोनवणे, वंदना वर्मा, करुणा जैस्वाल, संजय बोबडे, कुलदीप पंडित, रूपेश सावळे, प्रशांत सारवे आदींचा समावेश होता. या पदयात्रेच्या माध्यमातून चिंचभुवन जुनी वस्ती, मेहरबाबा नगर, काचोरे पाटीलनगर, लक्ष्मी लॅन्ड अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, बोबडे आटा चक्की परिसरात जनसंपर्क साधण्यात आला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपाच्या या पदयात्रेला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. पदयात्रेदरम्यान अनेक ठिकाणी परिसरातील महिलांनी अविनाश ठाकरे आणि नगरसेवक संदीप गवई यांचे पंचारतीने ओवाळून स्वागत केले आणि विजयासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता.

Web Title: Padyatra in Chinchbhavan, Meharbabanagar to promote the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.