नागपुरात रक्तदान करून बाबूजींना वाहिली आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 08:39 PM2019-07-02T20:39:51+5:302019-07-02T20:48:34+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. ‘लोकमत’ आणि ‘लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनंट व अप्रायसेस सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. ‘लोकमत’ आणि ‘लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनंट व अप्रायसेस सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाले.
‘लोकमत भवनात’ आयोजित या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, ‘लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनंट आणि अप्रायसेस सेंटर’चे संचालक डॉ. हरीश वरभे यांच्यासह ‘लोकमत’च्या विविध विभागातील प्रमुख व लोकमत परिवारातील सदस्य उपस्थित होते. एक सामाजिक जाणीव म्हणून या पवित्र कार्यात तरुणांसोबतच, प्रौढांनी विशेषत: महिलांही सहभागी झाल्या होत्या. लोकमतचे वाचक, अधिकारी, कर्मचारी, युवा नेक्स्टचे सदस्य व सखी मंच सदस्यांनी शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. १८ ते ६३ वर्षांपर्यंतच्या दात्यांनी रक्तदान केले. सकाळी ११ वाजतापासून सुरू झालेल्या या शिबिरात सायंकाळी ५ वाजतापर्यंत रक्तदात्यांनी गर्दी केली होती.
संचालन नेहा जोशी यांनी केले. या वेळी रक्तदात्यांना रक्तदान कार्ड, प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली. शिबिराच्या आयोजनासाठी ‘लाईफ लाईन’ रक्तपेढीचे डॉ. अनिता देशकर, प्र्रवीण साठवणे, रवी गजभिये, अंकिता सांगोळे, आयषा सिद्धीकी, अश्विनी खेकरे, प्रीती वागुळकर, समीक्षा राऊत, मीनल सोनकुसरे, माधुरी निखाडे, मोनाली निमजे, सूरज चिपळे, संजय कळंबे आदींनी सहकार्य केले.
वयाच्या ६३ वर्षी रक्तदानाचा संकल्प
रक्तदानासारखे दुसरे पुण्य नाही, हे फार उशिरा उमगले. परंतु उशिरा का होईना रक्तदानाचा संकल्प माझा सुरूच राहणार आहे, असे मत वयाची ६३ वर्ष ओलांडलेले सतीश राजे यांनी व्यक्त केले. राजे हे नरेंद्रनगर येथील रहिवासी आहेत. ‘लोकमत’ वृत्तपत्र वाचून त्यांनी मंगळवारी रक्तदान केले. ते म्हणाले, या वयात रक्तदान करताना अनेक जण घाबरतात, परंतु मी त्यांना माझ्या रक्तदानाचे उदाहरण देतो.
मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी असलेला राजन मुंडले याचा आज वाढदिवस. गेल्या १० वर्षांपासून तो वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करतो. राजन म्हणाला, यावर्षी ‘लोकमत’मध्ये रक्तदान करण्याचे ठरविले होते आणि योग जुळून आला. रक्ताची गरज कधी, कुणाला पडेल हे कुणालाच माहिती नसते. यामुळे प्रत्येकाने विशेषत: तरुणांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करावे, हा माझा आग्रह आहे.
‘लोकमत’मधील दहावे रक्तदान
बाबूजींच्या जयंतीनिमित्त लोकमतमध्ये रक्तदान करण्याचे हे दहावे वर्ष आहे. जोपर्यंत ‘फिट’ आहे तोपर्यंत रक्तदान करीत राहील, अशी भावना अनिल घाटोळ यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, घाटोळ हे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. रात्रीची ड्युटी करून ते सकाळी रक्तदानाला हजर झाले होते. रक्तदानानंतर मोठे समाधान मिळत असल्याचेही ते म्हणाले.
‘लंच टाईम’मध्ये रक्तदान
मोहननगर येथे राहणारे विजय कुमार हे एका खासगी हॉटेलमध्ये काम करतात. हॉटेलच्या ‘लंच टाईम’च्यावेळी त्यांनी ‘लोकमत’ गाठले आणि रक्तदान केले. ते म्हणाले, रविवारी ‘लोकमत’मधील रक्तदान शिबिराचे वृत्त वाचले आणि मंगळवारी रक्तदान करण्याचा निश्चय केला. आपल्या हातून समाजसेवा घडावी म्हणून रक्तदान करतो. रक्तदान महादान आहे, ते प्रत्येकाने करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
५५वे रक्तदान
ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीदिनी गेल्या अनेक वर्षांपासून गांधीबाग येथील रहिवासी व गायत्री शक्तिपीठाचे ट्रस्टी देवेंद्र व्यास हे ‘लोकमत’मध्ये रक्तदान करीत आले आहेत. व्यास म्हणाले, रक्तासाठी कुणाचा जीव जाऊ नये म्हणून वर्षांतून दोन-तीन वेळा रक्तदान करतो. हे माझे ५५वे रक्तदान आहे. रक्ताचे महत्त्व जो अडचणीत असतो त्यालाच समजते. म्हणूनच वयाच्या २४व्या वर्षांपासून रक्तदान करीत आहो आणि पुढेही करीत राहणार आहे.
रक्तदानाचा आनंद वेगळा असतो
रक्तदानात महिला मागे असतात. त्याला अनेक कारणे असतीलही, परंतु जेव्हा जेव्हा रक्तदानाची संधी मिळाली तेव्हा तेव्हा रक्तदान केले, असे मत धनश्री गंधारे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, रक्तदान करण्याचा एक वेगळा आनंद आहे आणि समाधानही आहे. आपल्या रक्तामुळे कुणाचा जीव वाचत असेल तर त्यापेक्षा पुण्याचे कार्य कोणते, म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून रक्तदान करीत आहे.
रक्तदानात यांचा सहभाग
मतीन खान, अरविंद बावनकर, मुश्ताक शेख, गौरव गुरलवार, लतेश भोपे, चंचलेश देशमुख, विकास तिजारे, देवेंद्र व्यास, निखील शेलोटे, झुझेर बुरानपुरवाला, आनंद इंगोले, धर्मदास वेल्लोरे, श्रीकांत मानवले, जयंत भोयर, क्रिष्णा यंबेवार, मुकेश ताजने, सुनील मिश्रा, निखील गोडके, नभाकुमार बेहारा, रमेश मारवाडी, प्रफुल नागमोते, मंगेश वाटकर, युवरा जवने, शुभम इंगळे, सुधाकर बागडे, राजेश चौधरी, विजय राऊत, आशिष वाकोडे, चंदू भोगाडे, रजत मुंडे, प्रफुल्ल हिवसे, संतोष कुंभारे, विनय सुतार, आतिश वानखेडे, दामोदर सारटकर, शैलेंद्र गेडाम, अमित फुलबांधे, विजय बन्सोड, पंकज धामदार, शिरीष निकोडी, अनिल घाटोळ, सुब्रोतो चॅटर्जी, अजय मंगाटे, स्नेहा नानवटकर, अश्विन पतरंगे, पल्लवी गुजर, वंदना वाडीभस्मे, धनश्री गंधारे, तुषार परदेसी, अश्लेषा लबडे, अर्चना जनगडे, सिद्धार्थ खोब्रागडे, आशिष बैस, सतीश राजे, स्वप्निल अर्विके, अशित बिजाडे, धनंजय पाटील, जितेंद्र मुंडले, रविराज आंबडवार, भोजराज पात्रे, साहिल जोध, प्रफुल्ल नंदा, राजकुमार अड्याळकर, अतुल इंझानकर, शिवराज आटे, संजय रामटेके व सुमेध वाघमारे आदींनी रक्तदानात सहभाग घेतला.