चित्रकार मनाेहरांना मिळावा विद्यापीठाचा जीवनगाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:26+5:302021-07-08T04:08:26+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांच्या सान्निध्यात राहून असंख्य चित्रे रेखाटणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार दिगांबर मनाेहर यांना राष्ट्रसंत ...
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांच्या सान्निध्यात राहून असंख्य चित्रे रेखाटणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार दिगांबर मनाेहर यांना राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाने मरणाेपरांत ‘राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज जीवनगाैरव’ पुरस्कार देऊन गाैरव करावा, अशी मागणी श्री गुरुदेव युवा मंचने केली आहे.
राष्ट्रसंतांनी लिहिलेल्या ग्रामगीतेत अर्पणपत्रिकेसोबत एक्केचाळीस अध्याय आहेत. त्यातील अर्पणपत्रिकेवरील शेतकरी आणि एक्केचाळीस अध्यायांसंबंधात संत महापुरुषांचे स्केच मनोहरांनी काढले आहे. तुकडाेजी महाराज ग्रामगीतेतील चित्राची कल्पना मनोहरांना सांगायचे आणि तेही हुबेहूब साकारायचे. राष्ट्रसंतांना प्रबाेधन करणाऱ्या बुद्धाचे चित्र हवे हाेते, ते मनाेहरांनी साकारले. राष्ट्रसंतांनी चित्रांची कल्पना सांगावी व संत महापुरुषांचे प्रेरणादायी चित्र मनोहरांनी रेखाटावे. ग्रामगीतेतील रेखाटलेल्या चित्रांना त्यांनी रंग भरला होता. नागपूरची ओळख निर्माण करणाऱ्यांमध्ये एक नाव मनाेहर यांचेही आहे. म्हणूनच नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी अध्यासनाद्वारे त्यांचा सत्कारही करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी त्यांची प्रकट मुलाखत झाली. राष्ट्रसंतांसोबतच्या त्यांच्या भेटीचे अनेक प्रसंग त्यांनी सांगितले. दुर्गादास रक्षक यांच्या आग्रहास्तव राष्ट्रसंतांच्या मनातील १४ विश्वमानवांच्या प्रतिमा मनाेहरांनी विश्वकाेषातून शाेधून ऑईल पेंटने साकारल्या. ही चित्रे श्री गुरुदेव मानव मंदिर, येरला येथे दर्शनी भागात लावली आहेत. मनाेहर आता हयात नाहीत; पण त्यांची चित्रे अजरामर आहेत. त्यांना विद्यापीठाचा ‘जीवनगाैरव’ पुरस्कार मिळायला हवा, अशी भावना ज्ञानेश्वर रक्षक यांनी व्यक्त केली.